शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

आमदारांना नडणाऱ्या फौजदारासाठी सत्ताधारी रस्त्यावर !

By admin | Published: April 06, 2017 6:00 PM

सर्वपक्षीय पाठिंबा : निलंबन मागे घेण्यासाठी प्रसंगी तीव्र लढ्याची तयारी

आॅनलाईन लोकमतकऱ्हाड (जि. सातारा), दि. ६ : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी काँगे्रस-राष्ट्रवादी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे नेतेही कर्जमाफीच्या सुरात सूर मिसळताना दिसतात. मात्र, दुसरीकडे कऱ्हाडचे काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील यांना नडणाऱ्या फौजदाराला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना, स्वाभिमानीसह मनसेचे पदाधिकारीही रस्त्यावर उतरल्याचे चित्र कऱ्हाडला पाहायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड तालुक्यात प्रचारादरम्यान विधान परिषदेतील काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकाला तांबवे येथे मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदार आनंदराव पाटील यांना पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी चुकीची वागणूक दिली, असा आरोप होत आहे.दरम्यान, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात काँगे्रसचे आमदार आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी कऱ्हाड तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना निलंबित करत असल्याची घोषणा विधान परिषदेत केली.दरम्यान, या घटनेनंतर सर्व स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. आनंदराव पाटील समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, निलंबनाचा निर्णय चुकीचा आहे असं म्हणत आमदारांना नडणाऱ्या फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना व स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन नलवडे व मनसेचे मनोज माळी यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर मंगळवारी कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलनही झाले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, शिवसेनेचे शहरप्रमुख शशिराज करपे, मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी, शिवसंग्रामचे रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे काँगे्रस आमदारांच्या विरोधात आणि एका फौजदाराच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजप, सेना, स्वाभिमानीसह मनसे, शिवसंग्रामचे पदाधिकारी एकवटलेले दिसत आहेत. काय घडली होती घटना..!जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धावपळ सुरू असताना तांबवे गावाजवळ आनंदराव पाटील यांचे वाहन अडविण्यात आले होते. त्यावेळी आमदार पाटील यांच्या अंगरक्षकाला प्रदीप जालिंदर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. पण ही तक्रार दाखल करायला गेलेल्या आमदार पाटील यांची मांजरे यांनी दखल घेतली नाही. त्यांना दोन तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवल्याचा पाटील यांचा आरोप आहे.मांजरे कामावरच !तालुका पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या निलंबनाची घोषणा होऊन आठ दिवस लोटले आहेत. मात्र, मांजरे प्रत्यक्षात आजही पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत दिसत असल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याच्या चचार्ही सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र, निलंबन झाले आहे की नाही. याबाबत अधिकृत माहिती देताना कोणीच दिसत नाही. स्वाभिमानी भाजपच्या शिवदासांचाही ठिय्या !कऱ्हाड तालुक्यातील भाजपच्या नेत्यांची मांजरेंच्या निलंबनाबाबत नेमकी काय भूमिका आहे, हे नक्की सांगता येत नाही. मात्र, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या ठिय्या आंदोलनाच्या उपस्थितीवरून भाजपही फौजदाराच्या बाजूने असल्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरपर्यंत काँगे्रसमध्ये असणारे शिवदास उमेदवारी नाकारल्याने भाजपवासी झाले आणि त्यांनी विजयश्री खेचून आणला. तो राग मनात धरून शिवदास आनंदराव पाटल यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याची चचार्ही सुरू आहे.