सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार उघडले. त्यामुळेच आज बहुसंख्य महिला शिक्षित झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेला वसा आपण पुढे चालवूया, असे आवाहन साहाय्यक पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी केले.
येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दलाल बोलत होत्या. यावेळी प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य डॉ. एल. एन. घाटगे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य अरुण बावळेकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात साहाय्यक पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी पोलीस दलाच्या वतीने कार्यरत निर्भया पथकाची माहिती दिली. तसेच हे पथक नेहमीच मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. सुवर्णा कुरकुटे यांनी सूत्रसंचालन केले.