शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अध्यक्षांना जागा बळकाविण्याची घाई

By admin | Published: February 15, 2016 10:49 PM

मनोहर बर्गे : खरेदी-विक्री संघाच्या जागेत संघ स्वत: का व्यवसाय करत नाही?

वाठार स्टेशन : ‘वाठार स्टेशन येथील कोरेगाव खरेदी-विक्री संघाच्या इमारती समोर व्यापारी संकुल बांधायचं आणि आपल्याच पै-पाहुण्यांच्या नावाने हे गाळे स्वत: बळकावयाचं राजकारण सध्या कोरेगाव खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष व काही मागिल दाराने संघात आलेले संचालक करत आहेत,’ असा आरोप करीत जर या संकुलासाठी १६८ जण अर्ज करून व्यवसाय करत असतील तर मग संघ स्वत: का व्यवसाय करत नाही? असा सवाल खरेदी विक्री-संघाचे संचालक मनोहर बर्गे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.बर्गे म्हणाले, ‘वाठार स्टेशन येथे कोरेगाव खरेदी-विक्री संघाची अगदी मोक्याची ठिकाणी दीड एकर जागा आहे. या पैकी साडेतीन गुंठ्यात इमारत असून इमारती समोर असलेल्या मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा डाव अध्यक्ष व काही संचालक करत आहेत. खरंतर १५ वर्षांपासून या ठिकाणी केवळ खत विभाग व गोडाऊन एवढच कामकाज संघाकडून सुरू आहे. कोरेगाव संघाची कोरेगाव शहरातील मोक्याची जागा ज्या पद्धतीने पूर्वीच्या संचालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बळकावली. त्याच पद्धतीने वाठार स्टेशनची जागा शॉपिंग सेंटरच्या नावाने बळकाविण्याचा डाव हे लोक करत आहेत. मूळात या ठिकाणी कोणतीही परवानगी नसताना अनाधिकृत इमारत बांधणार कशी? हाच प्रश्न आहे. जी अवस्था कोरेगावची झाली ती कोणत्याही परस्थितीत वाठार स्टेशनची होऊ देणार नाही,’ असा इशारा मनोहर बर्गे यांनी दिला आहे.अध्यक्षांनी जर आपण शेतकरी असाल तर संघाशी व्यवहार करायला शिका, नंतरच संघाच्या हिताचे निर्णय घ्या असा सल्लाही बर्गे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. आम्ही संस्थेच्याविरोधात नाही; पण चुकीच्या गोष्टी चालू देणार नाही, असे स्पष्टीकरणही बर्गे यांनीदिले. (वातार्हर)वाठार स्टेशन येथील खरेदी-विक्री संघाच्या जागेबाबत मनोहर बर्गे चुकीच्या पद्धतीने वक्तव्ये करत आहेत. मूळात संघ आज आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी वाठार स्टेशनच्या जागेत स्वत: संघाच्या वतीने बांधकाम करणार आहे. या साठी परिसरातील १६८ लोकांनी आमच्याकडे अर्ज दाखल केलेले आहेत. या माध्यमातून १ कोटी रुपयांचे डिपॉझिट मिळणार असून यातील व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी ६० लाख खर्च होणार आहेत. - शहाजी भोईटे, अध्यक्ष खरेदी-विक्री संघ, कोरेगाव