सातारा : दरवर्षी गणेश विसर्जनासाठी तळे खोदून लाखो रुपये खर्च करावे लागत होते. यंदा हा खर्च टाळण्यासाठी पालिकेने पावले उचलली असून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पालिकेचे शिष्टमंडळ भेटणार असून त्यानंतरच कोणत्या तळ्यात विसर्जन करायचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे. साताºयामध्ये दरवर्षी गणेश विसर्जनाचा मुद्दा ऐरणीवर येत असतो. राधिका रस्त्यावरील शेतीफार्ममध्ये मोठा खड्डा खणून गणेश विसर्जन केले जात होते. मात्र, यासाठी पालिकेला लाखो रुपये मोजावे लागत होते. ही खर्चिक बाब असल्यामुळे सातारकरांमधूनही याला विरोध होत होता. त्यामुळे यंदा हा खर्च टाळण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाच्या नियोजनसंदर्भात शनिवारी पालिकेमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विसर्जनाचाच मुद्दा चर्चेला गेला. मोती तळ्यामध्ये विसर्जन करण्याचे ठरविण्यात येत होते. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक असल्याने कोणत्या तळ्यात विसर्जन करायचे, हे अद्याप बैठकीतही ठरले नाही. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी चर्चा केल्यानंतरच विसर्जनाचा मुद्दा निकाली निघणार आहे, असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी यावेळी सांगितले. |
साताºयामध्ये विसर्जनाची जागा तळ्यात, मळ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 8:18 PM
सातारा : दरवर्षी गणेश विसर्जनासाठी तळे खोदून लाखो रुपये खर्च करावे लागत होते. यंदा हा खर्च टाळण्यासाठी पालिकेने पावले उचलली असून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पालिकेचे शिष्टमंडळ भेटणार असून त्यानंतरच कोणत्या तळ्यात विसर्जन करायचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना शिष्टमंडळ भेटणारसातारकरांमधूनही विरोधखर्च टाळण्याचा पालिकेने निर्णय