शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

घोड्यामागून सफाई कामगारांची वरात !

By admin | Published: December 23, 2014 12:31 AM

महाबळेश्वर : व्यावसायिकांचा घोड्यांसह पालिका, वन विभाग कार्यालयावर मोर्चा

महाबळेश्वर : समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या घोडेस्थानकावर घोडे व्यावसायिकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच सुशोभीकरणाच्या नावाखाली बंद करण्यात आलेला मुंबई पॉइंट येथील घोडे चालविण्याचा ट्रॅक सुरू करावा, या मागण्यांसाठी शहरातील घोडे व्यावसायिकांनी कुटुंबीय व घोड्यांसमवेत पालिका आणि वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, मुख्य बाजारपेठेतून घोडे गेल्याने सर्वत्र लीद पडली होती. दुर्गंधी पसरल्याने सफाई कामगारांनी लगेच स्वच्छता करण्यास सुरुवात केली. महाबळेश्वर येथे ब्रिटिश काळापासून घोडे व्यवसाय सुरू आहे. शहर व परिसरातील पॉइंटवर व्यवसाय करून अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करतात. घोडे व्यावसायिकांसाठी बसस्थानकासमोर पोनी स्टँड आहे. या ठिकाणी सध्या कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. घोड्यासाठी पिण्याचे पाणी किंवा निवाराही नाही. घोडे उभे करण्यासाठी जागा अपुरी आहे. तसेच या स्टँडची देखभाल, दुरुस्ती पालिका करीत नाही. या ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी घोडे व्यावसायिक मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. पालिकेने या मागण्यांचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. प्रत्येकवेळी आश्वासनावर घोडे व्यावसायिकांची बोळवण करण्यात येत होती. त्यामुळे व्यावसायिकांत संताप व्यक्त होत होता. यामधूनच घोडे व्यावसायिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. मात्र, पालिकेच्या गेटवरच मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर घोडे व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने प्रथम मुख्याधिकारी सचिन पवार व त्यानंतर नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. दोघांनीही घोडे व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत पालिका सहानुभूतीने विचार करेल, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबई पॉइंट येथील घोडे चालिवण्याचा ट्रॅक बंद करण्यात आला आहे. येथे सूर्यास्ताच्या वेळी पर्यटकांची मोठी गर्दी होते. ब्रिटिश काळापासून असणारा हा ट्रॅक बंद असल्याने घोडे व्यावसायिकांच्या व्यावसायावर त्याचा परिणाम झाला आहे. हा ट्रॅक सुरू करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला. वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. वरिष्ठांबरोबर चर्चा करून त्यांनी परवानगी दिल्यानंतर टॅ्रक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले. मोर्चा पंचायत समितीपासून सुरू झाला. तो मस्जिद रोडमार्गे शिवाजी चौक व तेथून वन विभागाच्या कार्यालयावर गेला. त्यानंतर बाजारपेठमार्गे मोर्चा पोलीस ठाण्यावरून बसस्थानकमार्गे पालिकेजवळ पोहोचला. या मोर्चात माजी नगरसेवक सज्जादभाई वारुणकर, संघटनेच अध्यक्ष जावेद खारखंडे, उपाध्यक्ष ताजुद्दीन वढाणे, डॉ. बशीर डांगे, आनिस बेपारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)