सातारा : राज्यात पिकांवर औषध फवारणी करताना शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद आता जिल्'ातील शेतकºयांसाठी सरसावली असून, पाच हजार शेतकºयांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट देणार आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात यवतमाळ जिल्'ात व इतर ठिकाणी पिकांवर औषध फवारणी करताना अनेक शेतकºयांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. सर्व बाजूंनी राज्य शासनावर टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शेतकºयांच्या दृष्टीने काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या. शासनाकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले. अशा या घटनेनंतर सातारा जिल्हा परिषदही शेतकºयांच्या सुरक्षेसाठी पुढे आली आहे. जिल्हा परिषदेने जिल्'ातील पाच हजार शेतकºयांना औषध फवारणीवेळी वापरण्यासाठी सुरक्षा किट वाटपाचा निर्णय घेतला. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. कृषी समिती सभापती मनोज पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शेतकºयांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.
जिल्'ात एकूण ९३४ दुकाने ही कीटकनाशक विक्रीची आहेत. या दुकानात सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तशा विक्रीच्या सूचनाही दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. या किटची किंमत १५० रुपये आहे. त्यापैकी ५० रुपये हे शेतकºयांनी भरायचे असून, १०० रुपये अनुदान मिळणार आहे. ७ नोव्हेंबरला ही योजना सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्'ातील सुमारे ५०० हून अधिक शेतकºयांची याचा लाभ घेतला आहे.आॅनलाईन पैसे जमा होणार...सुरक्षा किट घेणाºया शेतकºयांना १०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हे पैसे आॅनलाईनने जमा होणार आहे. किट घेतल्याची पावती, बँक पासबुक झेरॉक्स आणि मागणी अर्ज पंचायत समितीकडे जमा करायचा आहे. त्यानंतर हे पैसे शेतकºयांना मिळणार आहेत.
जिल्'ातील पाच हजार शेतकºयांना सुरक्षा किट वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद जिल्हा परिषदेने केली आहे. या किटमुळे शेतकºयांना सुरक्षित राहता येणार आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त शेतकºयांनी याचा लाभ घेतला आहे.- चांगदेव बागल, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद