शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 4:14 PM

मागील तीन वर्षात क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे प्रकल्पाने व्हेरी गुड श्रेणीमध्ये स्थान मिळवले

सातारा : आययूसीएन जागतिक संस्थेच्या मानकानुसार देशातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाचे चार वर्षातून एकदा मूल्यांकन होते. या अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कामगिरी उंचावली असून प्रकल्पाची नोंद 'खूप चांगले' श्रेणीत झाली आहे.२०१८ च्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ६०.१६ टक्के मार्क मिळवून ३७ व्या क्रमांकावर होता. मागील तीन वर्षात क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे प्रकल्पाने व्हेरी गुड श्रेणीमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच ५१ व्याघ्र प्रकल्पामध्ये ३७ व्या स्थानावरून २७ व्या स्थानावर प्रगती केली आहे. सद्य:स्थितीत रहिवासी वाघांची संख्या नसली तरी दक्षिणेकडून स्थलांतरित वाघ ये-जा करीत असतात. रानकुत्री, बिबटे, अस्वल इ. या शिकारी प्राणी व गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर इ. या भक्ष्य प्राणांच्या संख्येतही वाढ झाली आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना २०१० मध्ये झाल्यापासून २०१०,२०१४,२०१८ मध्ये प्रकल्पाने "फेअर व गुड" या श्रेण्या मिळविल्या होत्या. या वर्षीच्या अहवालात आतापर्यंत प्रथमच "खूप चांगले " श्रेणी मिळाली आहे. याच श्रेणीत देशातील २० व्याघ्र प्रकल्प असून याच श्रेणीत ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, काझिरंगा, कॉर्बेट, सुंदरबन, पन्ना, बांधवगढ या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. दि.९ एप्रिल रोजी म्हैसूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते "व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षे " या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी २०२२ वर्षातील प्रगणनेनुसार वाघांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार सद्य:स्थितीत भारतात ३,१६७ वाघांची नोंद करण्यात आली आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने केलेले काही परिणामकारक व्यवस्थापन कामेतृणभक्षी प्राणी विकास कार्यक्रम अंतर्गत व्याघ्र प्रकल्पात चितळांचे यशस्वी स्थानांतरण केले. भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून वाघांच्या स्थानांतरनाचा प्रस्ताव शासनास सादर, वनसंरक्षनाच्या दृष्टीने संरक्षणकुटी, निरीक्षण मनोरे, वायरलेस अद्यावत केले आहेत. व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर क्षेत्रामधील २०० किमी पेक्षा जास्त संरक्षण रस्त्यांची निर्मिती तसेच डागडूजी केली आहे. वन्यजीव अधिवास विकास कार्यक्रम अंतर्गत अखाद्य वनस्पतीचे निर्मूलन करून ५ हजार हेक्टर वरती गवत कुरणांचे व्यवस्थापन केले आहे. वन गुन्ह्यावर नियंत्रण आणले. बफर क्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे जंगल हे सह्याद्रीतील उर्वरित घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करते. बारा नद्यांचा उगम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून होत आहे. जल सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्पाच्या व तेथील लोकांच्या विकासामध्ये सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. - यू. एस. सावंत, उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग