शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

सह्याद्री प्रकल्पात दुर्मीळ ग्रिफॉन गिधाड, सह्याद्रीत २५४ प्रजातींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 12:09 PM

wildlife Forest Department Satara : सह्याद्री प्रकल्पात दुर्मीळ ग्रिफॉन गिधाड कॅमेराबद्ध झाल्याने पर्यावरणप्रेमी सुखावलेत; पण यापूर्वीही काही दुर्मीळ पक्षी या प्रकल्पात आढळून आले आहेत. त्यामध्ये राजगिधाड आणि निळा दयाळ या महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावेश आहे. तसेच प्रकल्पात आजपर्यंत वेगवेगळ्या पक्ष्यांच्या तब्बल २५४ प्रजातींची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देसह्याद्री प्रकल्पात दुर्मीळ ग्रिफॉन गिधाडसह्याद्रीत २५४ प्रजातींची नोंद

कऱ्हाड : सह्याद्री प्रकल्पात दुर्मीळ ग्रिफॉन गिधाड कॅमेराबद्ध झाल्याने पर्यावरणप्रेमी सुखावलेत; पण यापूर्वीही काही दुर्मीळ पक्षी या प्रकल्पात आढळून आले आहेत. त्यामध्ये राजगिधाड आणि निळा दयाळ या महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावेश आहे. तसेच प्रकल्पात आजपर्यंत वेगवेगळ्या पक्ष्यांच्या तब्बल २५४ प्रजातींची नोंद झाली आहे.पश्चिम घाटात आत्तापर्यंत ५०० प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यांपैकी २५४ प्रजातींची नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले. निळ्या पंखांच्या पोपटासारख्या (ब्लू विंग्ड पॅराकिट) काही जाती प्रकल्पात आहेत. त्या जगात फक्त पश्चिम घाटातच आढळतात.जगात फक्त पश्चिम घाटातच पक्ष्यांच्या २८ प्रजाती नोंदल्या गेल्या आहेत. त्या प्रजातींपैकी १३ जातींच्या पक्ष्यांची नोंद केवळ सह्याद्री प्रकल्पातच झालेली आहे. येथील समृद्ध पक्षिजीवन पाहता भारतीय पक्षी संवर्धन संस्था व बीएनएचएस या भारतातील प्रमुख संस्थांनी कोयना व चांदोली या जंगल क्षेत्राला जगातील महत्त्वाचे पक्षिक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सह्याद्री प्रकल्पात कीटकभक्षी, मांसभक्षी, फुलातील रस पिणारे, फळ खाणारे, शिकारी, दाणे-बिया खाणारे, मासे खाणारे असे विविध प्रकारचे पक्षी आहेत.... हे पक्षी केवळ प्रकल्पातच !जगात फक्त पश्चिम घाटातच काही पक्षी आढळतात. त्यांपैकीही निलगिरी वृक्ष कबुतर, मलबारी पोपट, मलबारी चंडोल, राखी डोक्याचा बुलबुल, तांबूस सातभाई, पांढऱ्या पोटाचा नाचरा, निलगिरी फुलटोचा, छोटा शिंजीर, किरमिजी शिंजीर, मलबारी धनेश, करड्या छातीचा हरेल, मलबारी मैना हे पक्षी सह्याद्री प्रकल्पात नोंदले गेलेत.

सह्याद्री प्रकल्पात...

  • चांदोली राष्ट्रीय उद्यान

क्षेत्र : ३१७६७ हेक्टर, जिल्हा : सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी कोयना अभयारण्यक्षेत्र : ४२३५५ हेक्टर, जिल्हा : सातारा(५ जानेवारी २०१० च्या अधिसूचनेनुसार चांदोली व कोयना सह्याद्री प्रकल्पात समाविष्ट)कोयना अभयारण्यात २००३ साली हिमालयात आढळणारा भारतीय निळा दयाळ तर २००७ मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानात राजगिधाड दिसले होते.प्रकल्पात आढळणारे महत्त्वाचे पक्षीपांढऱ्या पाठीचे गिधाड, भारतीय गिधाड, राजगिधाड, ठिपकेदार गरुड, महाधनेश, लोटेनचा सूर्यपक्षी, निलगिरी रानपारवा, नदी सुरय, मलबार पोपट, श्रीलंकन बेडूकमुखी, मलबार राखी धनेश, पांढऱ्या गालाचा तांबट, मलबार तुरेवाला चंडोल, निळा माशीमार, तांबूस सातभाई, छोटा सूर्यपक्षी, किरमिजी सूर्यपक्षी हे महत्त्वाचे पक्षी प्रकल्पात आढळतात.पक्षी निरीक्षणाची ठिकाणे१) राम नदी निरीक्षण मनोरा२) झोळंबी येथील कारंबली३) नवजा-ओझर्डे परिसर४) रामबाण परिसर५) नेचल दत्त धाम परिसर६) गाढवखोप ते बाजे परिसर७) वाल्मिकी मंदिर परिसर८) मोरगिरी धरण परिसरसह्याद्री प्रकल्पात अनुक्रमे मलबारी चंडोल, निलगिरी कबुतर, किऱ्या राघू, रेकॅट टेल्ड ड्रोनंगो, निळा रॉबिन, मलबारी पोपट या पक्ष्यांना पक्षिनिरीक्षक डॉ. जितेंद्र कात्रे व रोहन भाटे यांनी कॅमेराबद्ध केले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवKaradकराडSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग