महासंघाच्यावतीने यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना नवीन दराने सर्व अटी रद्द करून सरसकट शंभर टक्के वेतन देण्यात यावे, ही मागणी करण्यात आली. वेतन श्रेणीबाबत यावलकर समितीने दिलेल्या अहवालानुसार लवकर निर्णय घेण्यात यावा, असेही सांगण्यात आले. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईला सचिव यांच्यासह आपण पुन्हा बैठक घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुश्रीफ यांनी यावेळी दिले. लवकरच बैठकीची तारीख तुम्हाला कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे, सचिव कॉ. नामदेव चव्हाण, सरचिटणीस कॉ. श्याम चिंचणे, सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील गुरव व जिल्हा उपाध्यक्ष सुनील खरात आदी उपस्थित होते.
फोटो : ०२केआरडी०३२
कॅप्शन : सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.