जिंती : साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच विक्रमसिंह भोसले गटाने राजे गटाच्या पॅनेलला ९-७ ने धोबीपछाड देत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. सरपंचपदी विक्रमसिंह भोसले गटाच्या रेखा संजय जाधव यांची, तर प्रल्हादराव पाटील गटाचे अक्षय किरण रूपनवर यांची उपसरपंचपदी निवड झाली.
साखरवाडी (पिंपळवाडी) ग्रामपंचायतीवर राजे गटाचीच सत्ता होती. सरपंचपदी राजे गटाचे विक्रमसिंह भोसले यांची निवड केली होती. त्यांनी या कारकिर्दीत गावाचा कारभार अतिशय चांगला चालवला. उत्कृष्ट कामगिरी करूनही यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत काहींनी राजे पॅनेल व सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्यात फूट पाडली. विक्रमसिंह भोसलेंनी राष्ट्रवादी पुरस्कृतच स्वतंत्र गट तयार करून सहकाऱ्यांच्या साथीने निवडणूक लढवली. सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक विक्रमसिंह भोसलेंच्या कार्यामुळे डोईजड होत असल्याचे लक्षात येताच राजे गटाने रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांच्या कोपरासभा, पदयात्रांचे नियोजन केले.
सर्वसामान्य मतदार राजे पॅनेलच्या कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता विक्रमसिंह भोसलेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत विधायक विकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली. या निवडणुकीत त्यांना नऊ ठिकाणी यश मिळाले. प्रल्हादराव पाटील गटाला एक, तर राजे गटाला सात जागा मिळाल्या होत्या. विक्रमसिंह भोसले दोन जागांवर निवडून आल्याने एका जागेचा त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने त्यांच्याकडे आठ जागा राहिल्या. सरपंच, उपसरपंच निवडीच्या वेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावत राष्ट्रवादी पुरस्कृत विधायक विकास आघाडीला साथ दिली. त्यामुळे आता त्यांच्याकडे नऊ विरुद्ध सात असे बलाबल झाल्याने त्यांनी सत्ता स्थापित केली.
नूतन सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रूपनवर, ग्रामपंचायत सदस्य विक्रमसिंह भोसले, विक्रम ढेंबरे, मयूर लोखंडे, कीर्ती भोसले, अपर्णा बोडरे, सुषमा गाडे, गौरी आचरे यांचे तानाजी गायकवाड, हिरालाल पवार, सुरेश पवार, उत्तम मोहिते, उद्धव धुमाळ, राजेंद्र शेवाळे, पांडुरंग भोसले, किरण भोसले, भाऊ रुपणवर, राजेंद्र भोसले, डॉ. आनंदा जाधव, अंकुश भोसले, मनोज भोसले, स्वप्निल भोसले, सुनील वाघ, बाळासाहेब डुबे,
रामचंद्र महानुवर, राजेंद्र गाडे, तसेच विक्रमसिंह भोसले व प्रल्हादराव पाटील गटाचे प्रमुख यांनी कौतुक केले.
०२ रेखा जाधव
०२अक्षय रूपनवर