जगदीश कोष्टी ।सातारा : मेघगर्जनेसह वरुणराजा बसत असताना सातारकरांच्या कानावर दूर कोठूनतरी ढोल-ताशांचे आवाज ऐकायला मिळत आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने ढोल-ताशा पथकांचा सराव जोरात सुरू आहे. शेकडो तरुणाई भर पावसात घाम गाळून सराव करत आहे.गणेशोत्सव, दुर्गोत्सवात यापूर्वी मोठ्या आवाजात डॉल्बी लावली जात होती. डॉल्बीचे असंख्य दुष्परिणाम जाणवत असतानाही त्यांची क्रेफ कमी होत नव्हती. दोन वर्षांपूर्वी राजपथावरील सिटी पोस्ट कार्यालयाशेजारी दुर्घटना घडली अन् ‘लोकमत’ने डॉल्बीमुक्त साताराचा जणू संकल्पच केला. याला सातारकरांनी डोक्यावर घेतले अन् ती एक लोक चळवळ म्हणून उदयास आली. असंख्य गणेशोत्सव मंडळे डॉल्बीला रामराम करून पारंपरिक ढोलताशांकडे वळू लागले आहेत.ढोलपथकात सहभागी झालेल्या मुला-मुलींना पाहिल्यानंतर प्रत्येकाला अभिमान वाटतो. लहान मुलाला ढोल वाजवताना पाहून कौतुक वाटते. पण या ढोल पथकाचे काम वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी खूप मोठा सराव करावा लागतो. मिरवणूक चार-पाच तास चालणार असेल तर तेवढा वेळ वाजविण्याची तयारी ठेवावी लागते.साताºयातील मिरवणुकांमध्ये जास्तीत जास्त चाळीस ढोल वाजविण्यास पोलिस खाते परवानगी देतात; पण त्यासाठी पथकातील साताºयातील तांडव ढोलताशा आणि ध्वजपथकात ढोलसाठी चाळीस तरुण, ताशांसाठी पंधरा, ध्वज नाचविण्यासाठी अकरा, टोल वाजविण्यासाठी पाच असे ७५ तसेच बाहेरील माणसं आत येऊ नयेत म्हणून दोर धरण्यासाठी तेरा तसेच मिरवणूक व्यवस्थापन, प्रशिक्षणासाठी मिळून शंभरहून अधिक लोक काम करत आहेत. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांचाही समावेश आहे.नऊ वर्षांपासून पन्नास वर्षांचेही वादकढोल ताशा वाजवणे सध्या कौतुकास्पद वाटते. त्यामुळे नऊ वर्षांच्या मुलांपासून पन्नास वर्षांची व्यक्तीही तितक्याच उत्साहाने सहभागी होत आहे. ‘तांडव’मध्ये नऊ वर्षांची तिसरीत शिकत असलेली पलक पिसाळ ही टोल वाजविते तर पन्नास वर्षीय जयप्रकाश कुलकर्णी हे शंख वाजवितात.आवडीला वाव‘या पथकांमध्ये पुरुषांऐवढ्याच महिलाही सहभागी होत आहेत. सरासरी १५ जूनला सराव सुरू होतो. सुरुवातीस ढोल बांधण्यापासून ते वाजविण्यापर्यंत प्रशिक्षण दिले जाते. दररोज एक तास सराव घेतला जातो. ढोल वजनाला जड असला तरी वाजविण्यास सोपा तर ताशा हलका असला तरी वाजवायला अवघड असतो. त्यामुळे ज्यात आवड असेल तो वाजविण्यास दिला जातो,’ अशी माहिती निरज गवळी यांनी दिली.‘नो’ बिझनेस... ओन्ली समाजसेवा‘या पथकांचं अर्थकारण मोठे गमतीशीर आहे. पथकाला कितीही मोठी सुपारी मिळाली तरी सहभागी वादकालाही काहीही रक्कम दिली जात नाही. सहभागी होण्यापूर्वीच याची माहिती दिली जाते. जमा झालेल्या रकमेतून वाद्यांची दुरुस्ती, वादकांचे जेवण, त्यांचा प्रवास यासाठी खर्च केला जातो. उर्वरित रक्कम सामाजिक संस्था, गरीब, गरजू मुलांसाठी खर्च केली जाते,’ अशी माहिती सिध्देश केंजळे यांनी दिली.
सळसळत्या तरुणाईचा ‘ढोल बजने लगा !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:02 AM
जगदीश कोष्टी ।सातारा : मेघगर्जनेसह वरुणराजा बसत असताना सातारकरांच्या कानावर दूर कोठूनतरी ढोल-ताशांचे आवाज ऐकायला मिळत आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने ढोल-ताशा पथकांचा सराव जोरात सुरू आहे. शेकडो तरुणाई भर पावसात घाम गाळून सराव करत आहे.गणेशोत्सव, दुर्गोत्सवात यापूर्वी मोठ्या आवाजात डॉल्बी लावली जात होती. डॉल्बीचे असंख्य दुष्परिणाम जाणवत ...
ठळक मुद्दे डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांचाही समावेश