कऱ्हाड : सळवे, ता. पाटण विभागातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात आला. सळवेच्या माध्यमिक शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम सहा विद्यार्थ्यांना ट्रॉफी, बॅग, प्रशस्तिपत्र तसेच इतर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच महिंद गावचे समाजसेवक राहुल शेडगे यांनी शाळेला संगणक भेट दिला. संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा वरपेवाडी येथे विद्यार्थ्यांना मास्क तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय कदम, उपसचिव अजय कदम, गणेश कदम, अधिक कदम, भरत कदम, तुकाराम कदम, लक्ष्मण कदम, दीपक कदम, नितीन कदम, समाजसेवक राहुल शेडगे उपस्थित होते.
‘एसजीएम’मध्ये शिवतेज तेलाची निर्मिती
कऱ्हाड : शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग व येथील गाडगे महाराज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने सांधेदुखी व गुडघे दुखीवर गुणकारी शिवतेज आयुर्वेदिक तेलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा प्रारंभ रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रवींद्र पवार, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, सदानंद चिंगळे, जितेंद्र डुबल, किसनराव पाटील, अतुल कदम यांच्या उपस्थितीत झाला.
प्रदीप कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
कऱ्हाड : शेरे, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शिक्षक प्रदीप कुंभार यांना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा आदर्श पुरस्कार देण्यात आला. प्रदीप कुंभार यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला. शाळा १०० टक्के डिजिटल करण्यात कुंभार यांचा मोलाचा वाटा असून, शाळा बंद असल्या तरीही विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्याची नोंद घेऊन जिल्हा परिषदेने त्यांना गौरविले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सदस्य सुरेंद्र गुदगे उपस्थित होते.
जुने मालखेडला कोरोना लसीकरण मोहीम
कऱ्हाड : जुने मालखेड, ता. कऱ्हाड येथे रेठरे बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्र व बेलवडे बुद्रूक उपकेंद्राच्या वतीने कोरोना तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आरोग्य विभागाचे ननावरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नूतन पाटील, आरोग्यसेविका तृप्ती बनसोडे, आरोग्यसेवक मंदार काकडे, उषा धोत्रे, आशा सेविका भावना मंडले, अनिता कुंभार, कुंदा कुंभार, छाया भिंगारदेवे, वैशाली होवाळ, शारदा मंडले, शिक्षक चंद्रकांत तडाखे, देवचंद गारे, अनुराधा कांबळे, अंगणवाडी सेविका सरस्वती भोसले, सुमन यादव यांनी त्यासाठी विशेष परिश्रम केले.