शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Satara: येळगावच्या शेतकऱ्याने जमीन दिली महसूल खात्याला दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:20 IST

संभाजी कारंडे यांनी शेतकऱ्यांपुढे ठेवला नवा आदर्श

उंडाळे : कऱ्हाड तालुक्यातील येळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी संभाजी बाळकृष्ण कारंडे यांनी आपली रस्त्याकडेची सव्वादोन गुंठे जमीन महसूल प्रशासनाला दान दिली. गावातील तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयासाठी ही जमीन देण्यात आली आहे. यामुळे समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे.ग्रामीण भागात शासकीय कार्यालये असतील तर गावकऱ्यांची धावपळ होत नाही; मात्र जागेअभावी योग्य ठिकाणी ती बांधता येत नाहीत. अशावेळी गावकऱ्यांचं हित पाहता सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांनी जमीन दान देऊन पुण्याचे काम करावे असा सहज शब्द कारंडे यांना महसूल सेवक रमेश वसंतराव पाटील यांनी टाकला. क्षणाचाही विलंब न लावता कारंडे यांनी होकार दिला. त्यानंतर महसूल सेवक संघटनेचे माजी अध्यक्ष विकास ठोंबरे यांना ही बाब दोघांनी सांगितली. ठोंबरे यांनी हा स्वागतार्ह निर्णय कऱ्हाडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांना कळविला.तत्काळ संबंधित शेतकऱ्याला तहसीलदार कचेरीत बोलावून त्यांचा जाहीर सत्कारही घडवून आणला. या सत्काराला उत्तर म्हणून शेतकऱ्याने त्याच क्षणी संबंधित जमिनीचा रितसर दस्तावेज तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय येळगाव तर्फे तहसीलदार कऱ्हाड यांचे नावे करून दिला. एवढंच नव्हे तर या शेतकऱ्याने जमिनीच्या बदल्यात मिळणारी रक्कम सुद्धा नाकारली. यावेळी नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, प्रांत ऑफिसचे क्लार्क प्रवीण साळुंखे व येळगाव सर्कल मधील सर्व तलाठी उपस्थित होते.

अधिकारीही भारावून गेलेया शेतकऱ्याचा अल्प शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बकरी चारणे हा त्यांचा दुय्यम व्यवसाय आहे. त्यांना मुलगा नाही, मात्र इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलीलाच आपला मुलगा समजून ते तिच्यासाठी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. या शेतकऱ्याने आपला निर्णय तालुका प्रशासनाला कळविताच प्रशासकीय अधिकारीही अक्षरशः भारावून गेले. या दानशूर व्यक्तीचा इतरांनीही आदर्श घ्यावा अशा भावना यावेळी प्रांत अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडFarmerशेतकरी