शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

साऱ्याच पक्षांत इच्छुकांची मांदियाळी !

By admin | Published: January 17, 2017 12:11 AM

जोरदार तयारी : बंडखोरी रोखण्याचे राष्ट्रवादी, काँगे्रसपुढे मोठे आव्हान; उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची नेत्यांकडे धाव

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी वेगाने सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसोबतच भाजप, शिवसेना या केंद्र व राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षांनीही दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोरीला उधाण येण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी वेगाने घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीने फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेनेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. भाजपने करहर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून अबाधित राहिलेला आहे. राज्यात व केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यत्वाच्या निवडणूक अर्जासाठी तुफान गर्दी झाली आहे. विविध आरक्षणनिहाय अर्ज घेण्यासाठी इच्छुक उमेदवार रांगा लावत आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे नेते चांगलेच सुखावले आहेत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील सर्वाधिकार विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे देण्यात आले असल्याने त्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थिती लावली होती. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, पक्षनिरीक्षक सुरेशराव घुले, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती इदाटे, अशोक गोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला आरक्षित जागेसाठी काही माता-भगिनी लहान चिमुकल्यांसह ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसत होते. कोरेगाव, जावली, सातारा, वाई, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, माण, खटाव, कऱ्हाड, पाटण याठिकाणी १ हजार ५८१ अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती देण्यात आली. सभापतिपदांसाठी १९ रोजी आरक्षण सोडतजिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापतींसाठी गुरुवार, दि. १९ जानेवारी रोजी आरक्षण सोडत घेतली जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सातारा, वाई, कऱ्हाड, फलटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, माण, खटाव, पाटण, कोरेगाव पंचायत समितींच्या सभापतिपदी आरक्षण सोडत १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन भवनात होणार आहेत. मतदार यादीवर आक्षेपासाठी आज अखेरची मुदतजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेली मतदार यादी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच गटविकास अधिकारी कार्यालयांमध्ये लावण्यात आली आहे. या यादीवर १७ जानेवारीपर्यंत हरकती नोंदविता येणार असून, मंगळवारी याची शेवटची मुदत आहे.