शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पाउस पडला; कोयनेतून सांगलीचे पाणी बंद; मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम 

By नितीन काळेल | Published: September 27, 2023 6:48 PM

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू ...

सातारा : सांगली जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून होणार पाणी विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेत साठा वाढू लागला असून सकाळच्या सुमारास ९२ टीएमसीवर पोहोचला होता. तर सातारा जिल्ह्यात परतीचा पाउस पडत असलातरी पूर्व भागात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरीही आतापर्यंत सरासरीच्या ६० टक्क्यांच्या आसपासच पाउस पडला आहे. त्यातील दोन महिने हे कमी पावसाचे राहिले. फक्त जुलृ महिन्यातच चांगला पाउस झालेला. त्यामुळे पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख पाणी प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला होता. मात्र, आंगस्ट आणि सप्टेंबर महिन्याने निराशा केली. या दोन महिन्यात कमीच पर्जन्यमान झाले.आतातर पावसाळा संपत आला आहे. तरीही पाउस कमी असल्याने चिंता वाढलेली आहे.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगरला ५ आणि नवजाला ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला १६ मिलीमीटर पाउस पडला आहे. त्याचबरोबर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३९२२, नवजा ५५४९ आणि महाबळेश्वरला ५३४३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर बुधवारी सकाळच्या सुमारास काेयनेत ३९७५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात ९२.३८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. हे प्रमाण ८७.७७ टक्के इतके झाले आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १३ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक धरणांतून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तर सध्या परतीचा पाउस सुरू असलातरी पश्चिम भागात प्रमाण कमी आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यात पाउस पडत आहे. पण, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अजुनही ओढ्यांना पाणी नाही. बंधारे भरलेले नाहीत. परतीचा पाउस चांगला झाल्यास रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

सांगलीला दोनवेळा सोडले पाणी...कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. आतापर्यंत दोनवेळा सांगलीसाठी कोयनेतून विसर्ग करण्यात आलेला. पाच दिवसांपूर्वी सांगलीसाठी कोयनेतून सुरुवातीला १०५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मागणी वाढल्याने आणखी विसर्ग वाढवून २१०० क्यूसेक करण्यात आला. पण, गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात पाउस झाल्याने मंगळवारी रात्रीपासून सांगलीचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीKoyana Damकोयना धरणSangliसांगली