चाफळ :
जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालय सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांर्तगत घेण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत श्री समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज ऑफ आर्टस, चाफळची इयत्ता नववीमध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी सानिका संभाजी बाबर हिने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. तसेच तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमारजी साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, सातारा विभागप्रमुख शेजवळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंभार ए. जे. केंद्रप्रमुख अर्जुन पाटील, कदम डी. एस., कुंभार ई. ए. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय चव्हाण व सर्व सदस्य तसेच चाफळचे सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव देशमुख, माजी सरपंच वसंतराव जाधव, माजी जि.प. सदस्य डी. वाय. पाटील, आशिष पवार, विश्वस्त एल. एस. बाबर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.