दहिवडी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रासप’चे शेखर गोरे यांनी माण तालुक्यातील राजकारणात नव्या जोमाने एंट्री केली आहे. आमदार जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक शामराव नाळे यांनी आमदार गटाला रामराम ठोकून शेखर गोरे गटात प्रवेश केला होता. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी डॉ. संजय काशीद यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शेखर गोरे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे काशीद यांच्या रूपाने आमदार गटाला हा दुसरा धक्का बसला आहे.डॉ. संजय काशीद यांच्या पत्नी नलिनी काशीद या आमदार जयकुमार गोरे यांच्या गटातून ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी असल्याने काशीद यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे. डॉ. काशीद यांचा सिद्धनाथ उद्योग समूहाचे शिल्पकार वाघोजीराव पोळ यांनी सत्कार केला. डॉ. काशीद व नाळे यांच्या प्रवेशाने शेखर गोरे गटाला ताकद मिळाली आहे. काशीद यांचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा होणार आहे. काशीद यांच्याबरोबर गणेश गोसावी, नानासो जाधव, तात्यासो काशीद, अमोल शिंदे, चंदू काशीद, विजय काशीद, रवी शिंगाडे, मोहन गोसावी, शिवाजी गोसावी, पप्पू काशीद आदींनी प्रवेश केला आहे. जयंत कुबेर, मारुती गलंडे, बाळासो सावंत, बाळासो गुंडगे, पंढरीनाथ जाधव, सुरेश इंगळे, तानाजी जाधव, प्रदीप जाधव, झुंझारराव जाधव, मधुकर मोरे, गणपत मोरे, अमोल गुंडगे, मनोज मोरे, बापूराव मोरे, राजू इंगळे, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधीनिवडणूक अटीतटीची होणार...दहिवडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीची निवडणूक अटीतटीची होणार हे समोर आले आहे. असे असलेतरी ही निवडणूक दुरंगी का तिरंगी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संजय काशीद यांचाही शेखर गोरे गटात प्रवेश
By admin | Published: October 22, 2016 11:46 PM