साखरी गावाला पारंपरिक पैलवानकीचा वसा लाभला आहे. गावातील अनेक मल्लांनी कुस्ती स्पर्धेतील मैदाने गाजवली आहेत. संजय सावंत याचे आजोबा, वडील, चुलते, भाऊ यांनी आजपर्यंत कुस्तीचा छंद जोपासला आहे. संजय हा ठाणे येथे शिक्षण घेत असून, त्याने विद्यापीठातून सलग दोनवेळा व ठाणे महापौर केसरी स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. याअगोदर महाराष्ट्र केसरीसाठी जालना, अकोला, धुळे व पुणे येथे निवड झाली होती. तो लहानपणापासून साखरी येथील आझाद हिंद तालीम मंडळात कुस्तीचा छंद जोपासत होता. या यशाबद्दल ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुरेश ठाणेकर, सर्जेराव शिंदे, विलास निकम, रमाकांत पाटील, तुकाराम खुटवळ, वस्ताद विलास बबले, रंगराव पाटील, चंद्रशेखर शिंदे, पोपट निकम, अरविंद ठाणेकर यांच्याहस्ते साखरी आझाद हिंद तालीम मंडळाच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
फोटो : ०४संजय सावंत