शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार, सातारा जिल्ह्यात किती दिवसाचा मुक्काम.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: June 17, 2024 7:21 PM

सातारा : लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार आहे. हा सोहळा दि. ...

सातारा : लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार आहे. हा सोहळा दि. ६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन करणार आहे. यावर्षी सोहळ्याचे जिल्ह्यात पाच मुक्काम राहणार आहेत. तर ११ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.आळंदी येथून दि. २९ जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू होणार आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातन प्रस्थान करत सोहळा पंढरपूरला जातो. दि. ६ जुलै रोजी पालखी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात प्रवेश करणार आहे. रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. तर दि. ७ रोजीही लोणंद येथेच मुक्काम असेल. तर दि. ८ जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन पालखी लोणंद येथून मार्गस्थ हेाईल.दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल. तर मुक्काम तरडगाव, ता. फलटण येथे होणार आहे. ९ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा आणि विसावा वडजल येथे राहील. त्यानंतर रात्रीचा मुक्काम फलटण येथे राहणार आहे.दि. १० जुलै रोजी सकाळी फलटण येथून पालखीचे प्रस्थान होईल. सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, विसावा निंबळक फाटा येथे असेल. तर रात्रीचा मुक्काम बरड येथे असणार आहे. दि. ११ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशासाठी बरड येथून पालखीचे प्रस्थान होईल.त्यानंतर सकाळचा विसावा साधबुवाचा ओढा तर दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ होईल. त्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूरमधील रात्रीचा मुक्काम हा माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी