शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

सरपंचही राजीनामा देत नाही, पण विचारांशी बांधील राहून खासदारकीचा राजीनामा दिला : उदयनराजे भोसले

By दीपक देशमुख | Published: January 09, 2024 5:44 PM

सातारा : आजपर्यंत अनेक लोकसभा लढलो. पोटनिवडणुकीवेळी तर प्रत्येकाने सांगितले, उदयनराजे तुम्ही आत्महत्या करता आहात. कारण साधा सरपंचसुद्धा पदाचा ...

सातारा : आजपर्यंत अनेक लोकसभा लढलो. पोटनिवडणुकीवेळी तर प्रत्येकाने सांगितले, उदयनराजे तुम्ही आत्महत्या करता आहात. कारण साधा सरपंचसुद्धा पदाचा राजीनामा देत नाही. पण मी नवनियुक्त खासदार असूनही तीन महिन्यात मी राजीनामा दिला. कारण माझी बांधिलकी छत्रपती शिवरायांच्या विचारांशी आहे.  जो छ. शिवरायांचे विचार आचरणात आणेल त्याच्याशी मी सहमत असेन, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.सातारा येथे जलमंदीर पॅलेस येथे विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते झाला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. माजी आमदार मदन भोसले, माजी सभापती सुनील काटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले, शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल. परंतु, निवडून आल्यनंतर पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला. याचे कारण माझी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी बांधिलकी आहे. जे त्यांचे विचार आचरणात आणतो, त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे. मी राजकारण कधी केले नाही व करणारही नाही. मी समाजकारण करणारा आहे. लोकांचे हित जोपासले जाईल, हाच माझा प्रयत्न असतो. ज्यांचे विचार पटत नाहीत, त्यांच्यासोबत जाणं हा ढोंगीपणा झाला. खा. उदयनराजे पुढे म्हणाले, चुकीच्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या तेव्हा मी घरचा आहेर दिला म्हणून ओरड झाली. पण मी जरी चुकीचा वागलो तर मलाही शिक्षा झाली पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोकं आपणाला निवडून देतात, तेव्हा आपलंही कर्तव्य असतं की त्या लोकांच्या नजरेततून उतरू नये. परंतु, जो माणूस स्वत:च्या नजरेत पडतो, तेव्हा कुणाला तोंड दाखवू शकत नाही.यावेळी अनेकजण यांनी उमेदवारीची मागणी केली आहे पण स्वतः उदयनराजे उमेदवारीबाबत अद्याप काही बोलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला असता ज्या लोकांनी उमेदवारीची मागणी केली ती माझ्यासाठीच केली असल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. यावेळी अजय मिश्रा यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले