अकरा सदस्यसंख्या असलेल्या वहागाव गावच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील परिवर्तन पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवले होते, तर विरोधी सहकार पॅनेलला या निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या. सरपंच व उपसरपंच निवडीत सरपंचपदी संग्राम पवार यांची, तर उपसरपंचपदी आनंदी पवार यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, धनंजय पवार, हणमंत शिंदे, सदस्या रंजना पवार, शिला पवार, सुजाता पुजारी आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. के. पाटील व एस. बी. घुटे यांनी काम पाहिले. पारदर्शक कारभार व विकासाच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू समर्थक माजी उपसरपंच दीपक पवार, अधिकराव पवार, भिकोबा पवार, शंकर पवार, परबती पवार, सुभाष पवार, जनार्दन पवार, बाळासाहेब पवार, निवास पवार आदींच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलने ही निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अकरापैकी आठ जागांवर यश मिळाले.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, अॅड. उदयसिंह पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
फोटो : ०५संग्राम पवार
फोटो : ०५आनंदी पवार