यावेळी सरपंच पंकज दीक्षित, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, प्रा. कादर पिरजादे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, दत्तात्रय जगदाळे, आनंदराव जाधव, अतुल शहा, सचिन दीक्षित, हिमांशू शहा, दिनेश शहा, सिकंदर शेख, संजय जाधव यांची उपस्थिती होती.
येथील गौतम अॅग्रो टुरिझमच्या मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास १० हजार रुपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास ५ रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकास ३ हजार रुपये व चषक अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत तर अंतिम सामन्यात सलग तीन चौकार ५०१ रुपये, मेडन ओव्हर ५०१ रुपये, मालिकावीर ५०१ रुपये अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत मर्यादित ६४ संघांना सहभाग घेता येणार आहे तसेच सहभागी संघांना समितीचे नियम व अटी पाळणे बंधनकारक राहणार आहे.
या स्पर्धेसाठी उपसरपंच विजयसिंह जगदाळे, अतुल शहा, विलास कांबिरे, संतोष जाधव, हिमांशू शहा, शांताराम मोरे, संतोष हजारे, प्रतीक शहा, ओसवाल मेडिकल, ओंकार दीक्षित, योगेश दीक्षित, सचिन दीक्षित, समरसिंह जगदाळे, सौरभ जगदाळे यांनी विशेष सहकार्य केले आहे.
फोटो : ०८केआरडी०१
कॅप्शन : मसूर (ता. कऱ्हाड) येथे आयोजित सरसेनापती हंबीरराव चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंकज दीक्षित, सुदाम दीक्षित आदी उपस्थित होते.