अजय जाधवउंब्रज: दिल्लीच्या राजपथावर ५ वर्ष सैन्यदलाने दिलेले कर्तव्य ज्या सैनिक जवानाने पार पाडले. त्याच राजपथावर प्रजासत्ताक दिनी मानाचे समजणाऱ्या संचलनात 'त्या' सैनिकांच्या सैनिक मुलाची देशातून मोजक्या जवानांच्यामध्ये निवड झालीय. हे घडवलेय कराड तालुक्यातील कंळत्रेवाडी येथील थोरात कुटुंबांच्या देशसेवा करणाऱ्या तिसऱ्या पिढीने. जवान ऋषिकेश राजेंद्र थोरात याने.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी भारतीय सैन्य दलाकडून राजपथावर पथसंचलन होते. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. या पथसंचलनात सहभागी होण्याचे प्रत्येक जवानांचे स्वप्न असते. असेच स्वप्न पाहणाऱ्या ऋषिकेश थोरात यांची गेल्या वर्षी सैन्यदलात निवड झाली. त्याचे आजोबा बाजीराव रामचंद्र थोरात हे सैन्यदलात होते. त्यानंतर वडील राजेंद्र थोरात आणि आता ऋषीकेश हा ही सैन्यदलात सेवा बजावत आहे. सीमेवरील देशसेवेचा दैदीप्यमान वारसा या तिसऱ्या पिढीनेही पुढे चालवला आहे.ज्या राजपथावर सैनिक ऋषिकेश थोरात संचलन करणार आहे. त्या राजपथावर ऋषिकेशचे वडील माजी सैनिक राजेंद्र थोरात यांनी मराठा लाइफ इन्फन्ट्रीच्या वन आर्मी हेडकॉटरच्या सिग्नल रेजिमेंट मध्ये ५ वर्ष कर्तव्य बजावले होते. त्याच राजपथावर ऋषिकेश याची देशातील मोजक्या सैनिकात निवड झाली आहे. पाहिलेले स्वप्न पूर्ण मी सैन्यदलात असताना मराठा लाइफ इन्फन्ट्रीच्या वन आर्मी हेडकॉटरच्या सिग्नल रेजिमेंटच्या माध्यमातून ५ वर्ष राजपथावर कर्तव्य बजावले. त्यावेळी मला वाटायचे की भविष्यात ऋषिकेश या संचलनात सहभागी होऊ शकेल का...त्या वेळी मी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. याचा नक्की अभिमान वाटतो. - राजेंद्र थोरात, माजी सैनिक, ऋषिकेशचे वडील
दिल्लीतील पथसंचलनात झळकणार सातारचा ऋषिकेश थोरात, देशसेवेत थोरात कुटुंबांची तिसरी पिढी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 4:57 PM