सातारा, दि. 26 : : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने व सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेने घेतलेल्या कब क्लास व कॅडेट बॉईज अॅण्ड गर्ल्स जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीने ३८ सुवर्णपदकांची कमाई करुन आपला दबदबा कायम ठेवला.
येथील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीच्या खेळाडुंनी चमकदार कामगिरी करुन अपेक्षेप्रमाणे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नागपूर येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अॅकॅडमीची टीम नागपूरला रवाना झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि प्रशिक्षक जयसिंग पाटील साताºयात आले होते. त्यांनी सर्व खेळाड ुंचे कौतुक केले. यावेळी अॅकॅडमीचे आंतराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहायक प्रशिक्षक विनोद दाभाडे यांच्यासह सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, दौलत भोसले, अमर मोकाशी, रवींद्र होले, डॉ. राहूल चव्हाण, मोहन पांडे, विनोद राठोड, मयुर दिघे, विजय मोहिते, अमोल तांगडे, जितेंद्र भोसले, तन्वी जगताप, विजय शिंदे, संजय पवार, दिपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध वजनगटात झालेल्या स्पर्धेत अॅकॅडमीच्या यश साठे, ओम कदम, आदित्य जाधव, पार्थ ढोणे, शंभुराज गाढवे, वेदांत नलवडे, जय चव्हाण, आयुष मोकाशी, ओमकुमार फरांदे, विक्रम कर्डिले, ओमकार गाढवे, राजवर्धन शिंदे, सुहेल शेख, रिषिका होले, मृणाल जाधव, स्रेहा चव्हाण, उत्कर्षा पवार, चैत्राली पवार, श्रावणी यादव, नेहा विभुते, श्रावणी भोसले, समिक्षा होले, आदिती कदम, संस्कृती दळवी, यशश्री धनावडे, अक्षता जाधव, तृप्ती काकडे, प्राजक्ता यादव, अथर्व भोसले, श्रवण माने, श्रेयश शेलार, ओम घोरपडे, अभिषेक गायकवाड, वरद वाघमळे, अथर्व गोंजारी, यासर मुलाणी, साईराज चव्हाण, सुमीत घाडगे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
हे खेळाडू नागपूर येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.