फलटण (सातारा) : सांगोल्यावरून वाशी, मुंबईकडे डाळींब घेऊन भरधाव निघालेल्या कंटेनरचा मागील अॅक्सल अचानक तुटला. त्यामुळे कोळकी हद्दीतील राव रामोशी पुलावर बुधवारी सकाळी कंटेनर उलटला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला.याबाबत माहिती अशी की, सांगोला परिसरातून डाळींब घेऊन कंटेनर (एमएच ४५ एच ३४२९) मुंबईकडे निघाला होता. तो बुधवारी सकाळी आठच्या सुमारास फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत आला. राव रामोशी पुलावर आला असता कंटेनरच्या मागील चाकाचा अॅक्सल अचानक तुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने तो पुलावरील संरक्षक कठड्यावर उलटला. यामध्ये कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.या अपघातात चालक कौसर नासिर मिया आलम (वय २८ रा. झारखंड) गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन चालकाला बाहेर काढले. तसेच त्याला तातडीने फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.डिझेल टाकीही फुटलीया मार्गावर सकाळी वर्दळही कमी असल्याने भरधाव निघालेल्या कंटेनरचा अॅक्सल अचानक तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. पुलावरील संरक्षक कठड्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात डिझेलची टाकीही तुटली.
सातारा : भरधाव कंटेनरचा मागील अॅक्सल तुटल्याने अपघात, चालक जखमी, फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत दुर्घटना; संरक्षक कठड्यामुळे अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:57 AM
सांगोल्यावरून वाशी, मुंबईकडे डाळींब घेऊन भरधाव निघालेल्या कंटेनरचा मागील अॅक्सल अचानक तुटला. त्यामुळे कोळकी हद्दीतील राव रामोशी पुलावर बुधवारी सकाळी कंटेनर उलटला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला. यामध्ये कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.
ठळक मुद्देभरधाव कंटेनरचा मागील अॅक्सल तुटल्याने अपघात, चालक जखमी फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत दुर्घटनासंरक्षक कठड्यामुळे अनर्थ टळला