रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाताना गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री सातारा रेल्वेस्थानक गाठावे लागत आहे.कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराला प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राज्यातील पहिली व देशातील दुसरी नगरपरिषद म्हणूनही रहिमतपूरची ओळख आहे. रहिमतपूरपासून चार किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन असून धामणेर रेल्वे स्टेशन म्हणूनही ओखले जाते. परंतु त्याची नोंद रहिमतपूर रेल्वे स्टेशन अशीच आहे. या रेल्वे स्टेशनचा म्हणावा असा विकास झालेला नाही.
मात्र, या स्टेशनवर पॅसेंजर, कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्पे्रस याच गाड्या थांबतात. इतर महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने जवानांसह त्यांच्यारबरोबर ये-जा करणाऱ्या कुटुंबीयांची गैरसोय होते.या स्टेशनवरुन चोवीस तासांत वीस ते पंचवीस गाड्या धावतात. देशसेवा बजावणाऱ्या जवानांना प्रामुख्याने जम्मू-काश्मिर, श्रीनगर, पंजाब, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, नागालँड, आसाम आदी ठिकाणी जावे लागते. ज्या ज्या ठिकाणी कुटुंबीयांना राहण्याची सोय आहे.
त्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेची वेळ रात्री-अपरात्री दुपारची कधीचीही असू शकते. त्यामुळे त्यांना सातारा रेल्वेस्थानकात सोडून येताना अपघात घडत आहेत. त्यामुळे रहिमतपूर रेल्वे स्टेशनमध्ये एक्स्प्रेसला थांबा देण्याची गरज निर्माण झाली आहे.या एक्स्प्रेसंना हवाय थांबारहिमतपूर रेल्वे स्थानकात गोवा-निजामुद्दीन, जोधपूर, महालक्ष्मी, हुबळी, चंदीगड एक्स्प्रेस थांबणे गरजेच्या आहेत. त्यातील गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस सातारा व कऱ्हाड येथे थांबते. या सर्व गाड्यांना रहिमतपूरलाही थांबा देणे गरजेचे आहे.