शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

साताऱ्याची बाजीराव विहीर झळकली पोस्टकार्डवर!, महाराष्ट्रातील आठ ऐतिहासिक विहिरींचा समावेश

By सचिन काकडे | Published: October 12, 2023 7:02 PM

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला

सातारा : साताऱ्यातील जलमंदिर परिसरात असलेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘बाजीराव विहिरी’चे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकल्याने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्रीय डाकघर विभागाने स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विहिरीचा अनोखा सन्मान केला.छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. चौथ्या राजधानीचा मान मिळालेल्या या किल्ल्यावरूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी बाजीराव विहीर बांधण्यात आली. केंद्रीय डाक विभागाने राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त भारतातील उल्लेखनीय विहिरींचे निरीक्षण केले. त्यातील बारव, बावडी, पुष्करणी, पोखरण, पायविहीर, घोडेबाव, पोखरबाव अशा वेगवेगळ्या विहिरींतून महाराष्ट्रातील आठ विहिरींच्या छायाचित्राचा समावेश पोस्टाच्या पुस्तिकेत केला आहे. त्यामध्ये नाशिक, अमरावती, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तर परभणी जिल्ह्यातील चार अशा एकूण आठ विहिरींचा समावेश आहे. साताराच्या बाजीराव विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर प्रसिद्ध झाल्याने सातारा शहराच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद बाब ठरली आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र प्रसिद्ध होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र बारव संवर्धन समितीचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे, राजेश कानिम, शैलेश करंदीकर, धनंजय अवसरे, हेमंत लंगडे यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातून बाजीराव विहिरीची जपणूक केली जात आहे.

विहिरीची अशी आहेत वैशिष्ट्य..ही विहीर १०० फूट खोल असून, तिचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे. नऊ कमानी असलेल्या या विहिरीत छत्रपती शाहू महाराज यांचे राजचिन्हांसह शिल्प कोरण्यात आलेले आहे. विहिरीत आजही जिवंत पाण्याचे झरे असून, पूर्वी कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत होते.

साताऱ्यातील बाजीराव विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकले असून, सातारकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. एमआयटी स्कूल ऑफ आर्किटक्चर पुणे, रोहन काळे, राजेश कानिक यांच्या परिश्रमपूर्वक योगदानाचे निश्चितच कौतुक आहे-  उदयनराजे भोसले, खासदार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPost Officeपोस्ट ऑफिस