सातारा : जिल्हा बँकनिवडणूक निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मतांनी पराभव झाला आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शिंदे यांचा पराभव केला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 तर ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली.नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. तर आता जाणून घेवूयात कोणत्या मतदार संघात कोणाचा विजयी झाला ते लाईव्ह अपडेट मधून...जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ
उमेदवार मिळालेली मतेशशिकांत शिंदे 24ज्ञानदेव रांजणे 25
पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळवून विजयी झाले आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 तर सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळाली.पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघउमेदवार मिळालेली मतेशंभूराज देसाई 44सत्यजितसिंह पाटणकर 58
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून महसुल मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे 74 इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा 8 इतक्या मतांनी पराभव केला आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. येथील लढत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांच्यात झाली होती. बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाली.
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ
उमेदवार मिळालेली मतेबाळासाहेब पाटील 74उदयसिंह पाटील 66
कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गट
कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून विजय उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी पंचेचाळीस मते मिळालेले आहेत. येथे 90 मतदान झाले होते. शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मते मिळाली आहेत. येथे एकूण 74 तर मते होती. मात्र मतदानादिवशी 72 मतदान झाले होते दोन मतदारांनी मतदान प्रक्रियेचे पाठ फिरवली होती.
खटाव सोसायटी गटात धक्तादायक निकाल लागला आहे. कारण या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिलेल्या नंदकुमार मोरेंचा पराभव झाला आहे. प्रभाकर घार्गे यांनी मोरे यांचा पराभव केला आहे. नंदकुमार मोरेंना ४६ मते तर प्रभाकर घार्गे ५६ मते मिळाली आहेत.
खटाव सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मतेनंदकुमार मोरेंना ४६प्रभाकर घार्गे ५६ बँक व पतसंस्था गटात रामराव लेंभे विजयी झाले आहेत. रामराव लेंभे यांना ३०७ तर सुनील जाधव यांना ४७ मते मिळाली आहेत.
बँक व पतसंस्था गट
उमेदवार मिळालेली मतेरामराव लेंभे ३०७सुनील जाधव यांना ४७
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात शेखर गोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रदीप विधाते यांनी गोरे यांना पराभवाची धुळ चारली. शेखर गोरे 379 मते मिळाली. तर, प्रदीप विधाते यांनी 1459 मते मिळवत गोरे यांचा मोठा फरकाने पराभव केला.
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ
उमेदवार मिळालेली मतेशेखर गोरे 379प्रदीप विधाते 1459
महिला प्रवर्ग गट
महिला प्रवर्ग गटात राष्ट्रवादीच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे विजयी झाल्या आहेत. ऋतुजा पाटील यांना १४४५ व कांचन साळुंखे यांना १२९२ मते मिळाली. त्यानी अनुक्रमे शारदादेवी कदम व चंद्रभागा काटकर यांचा पराभव केला. शारदादेवी कदम यांना ६१८ तर चंद्रभागा काटकर यांना १४१ मते मिळाली.
अकरा जागा यापूर्वीच बिनविरोधजिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी अकरा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दहा जागांसाठी रविवारी दि.२१ मतदान झाले. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधून ९६ टक्के मतदान झाले आहे.