शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

सातारा बाजार समिती जागा वाद; शिवेंद्रराजेंसह ८० जणांवर गुन्हा; दोन्ही बाजुंच्या १२५ जणांवर गुन्हा 

By नितीन काळेल | Published: June 22, 2023 3:24 PM

सातारा : सातारा शहराजवळील संभाजीनगरमध्ये बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या वादातून आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा ...

सातारा : सातारा शहराजवळील संभाजीनगरमध्ये बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या वादातून आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा खासदार उयनराजेंच्या गटानेही तक्रार दिली. त्यानुसार आता शिवेंद्रसिंहराजेंसह सुमारे ८० जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तर याप्रकरणात आता दोन्ही राजेंसह सुमारे १२५ जणांविरोधात गुन्हा नोंद आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी संभाजीनगरमध्ये सातारा बाजार समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ होता. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले समोरासमोर आले होते. यामुळे वाद वाढत गेला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला. पण, त्यानंतर दोन्ही राजेंचे आरोप प्रत्यारोप सुरु होते. तर याप्रकरणी आमदार गटाचे व सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ४५ जणांच्याविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा नोंद केला. तर त्यानंतर रात्री उशिरा खासदार गटाने तक्रार दिली.खासदार गटाच्या वतीने संपत महादेव जाधव (रा. संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे, आमिन कच्छी, विजय पोतेकर, भिकू भोसले, रमेश चव्हाण, राजेंद्र नलवडे, वंदना कणसे, आशा गायकवाड, शैलेंद्र आवळे, संजय पवार, अनिल जाधव, धनाजी जाधव, नामदेव सावंत, फिरोज पठाण, रवी ढोणे, कांचन साळुंखे, अविनाश कदम, रवी पवार, शेखर मोरे, सुनील जंवर, नंदकुमार गुरसाळे, उत्तम नावडकर, अमित महिपाल, अमर मोरे, मिलींद कदम, सुजीत पवार, शैलेश देसाई, अरविंद चव्हाण आदींसह एकूण ८० जणांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा...आमदार गटाच्या वतीने जीवे मारण्याची धमकी आणि विकसनाचे काम करु न दिल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. तसेच खासदार गटाच्या वतीनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ८० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मला व माझा पुतण्या अॅड. सागर गणपत जाधवला बोलवून आमच्या कामात आडवे आल्यास खल्लास करु अशी धमकी दिल्याचे संपत जाधव यांनी तक्रारीत स्पष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले