साताऱ्यात मोठी घडामोड! आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:27 PM2020-06-27T12:27:13+5:302020-06-27T13:35:48+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील जेव्हा शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या, अशा प्रकारची आर्जव केली होती.
सातारा : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथील विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या मनातून राष्ट्रवादी काँग्रेस बाबतचे प्रेम कमी झालेले नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील जेव्हा शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या, अशा प्रकारची आर्जव केली होती. आज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजित पवार यांची घेतलेली भेट राजकीय भेट होती की शहरातील सर्वसामान्य प्रश्नांसंदर्भात भेट होती याबद्दल साताऱ्यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपण शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही कधीही विकास कामांबाबत अडथळा आणत नाहीत, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे शहरातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न त्याबरोबरच एमआयडीसी, अर्धवट राहिलेलं कास धरणाचे काम आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात निवेदन हे अजित पवार त्यांनी दिले असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले. मात्र, दरम्यानच्या काळात अजित पवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा झालेली असू शकते हे देखील नाकारता येत नाही.
सातारा का महत्वाचे?
महाराष्ट्र राज्यासाठी सातारा खूप महत्वाचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्राचे राजकीय केंद्र सातारा ठरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या मतदारसंघातूनच निवडणूक लढवतात. त्यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना उमेदवारी दिली जाते. मात्र, लोकसभेला जिंकलेल्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. यानंतर विधानसभेच्या तोंडावर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीदेखील राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. दोन्ही निवडणुका एकाचवेळी झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्व ताकद पणाला लावत उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. तर शिवेंद्रसिंह राजे निवडून आले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले
Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला
देश हादरला! भारतात कोरोना रुग्णांनी ओलांडला पाच लाखांचा टप्पा
बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का
India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे
Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार
पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित
CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी