महाबळेश्वर/पोलादपूर : पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात आल्यानंतर बचाव पथकानं शोधकार्य थांबवले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या मदतीनं शोधकार्य राबवण्यात आले. दरम्यान, खिडकीतून बाहेर फेकले गेल्याने वाचलेल्या एकाने दरीतून वर येऊन माहिती दिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात आली. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत कर्मचारी दापोली व चिपळूण तालुक्यात राहणारे आहेत. त्या भागांत शोककळा पसरली आहे.
(Satara-Poladpur Bus Accident : बस अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो)
(Satara Bus Accident: बसमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती अन् होत्याचं नव्हतं झालं!)
शनिवार, रविवार अशी सलग दोन दिवस सुट्टी असल्याने कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघाले होते. विद्यापीठाचीच बस त्यांनी घेतली होती. एकूण ३२ कर्मचारी, दोन चालक, वाहक असे 34 जण सकाळी 7 वाजता निघाले. आंबेनळी घाट पायथ्याच्या धबधब्याजवळ त्यांनी बस थांबविली. तेथून ते महाबळेश्वरकडे निघाले. चालक प्रशांत भांबेड बस चालवत होता. धुके असल्यामुळे बसचा वेगही फारसा नव्हता. बसमध्ये सर्वजण हास्यविनोदात मग्न होते. चालक भांबेडही त्यात सहभागी होते. अशाच एका विनोदावर त्याने काही क्षणासाठी मागे वळून पाहिले आणि तिथेच घात झाला. बस दाभिक टोकाजवळ उजव्या बाजूला आठशे फूट दरीत कोसळली. गाडीच्या काचा फुटून अनेक जण बाहेर फेकले गेले, तर काही जण बसखाली दबले गेले.कृषी विद्यापीठाचे सहायक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई बसच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले आणि बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर झाडांचा आधार घेत ते रस्त्यावर आले. त्यांनी मोबाइलवरून विद्यापीठात फोन करून अपघाताची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यपाल विद्यासागर राव यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
दैव बलवत्तर म्हणून वाचलोदरवर्षी पावसाळी सहल काढण्यात येते. आठवडाभरापूर्वीच वर्षा सहलीचे नियोजन सुरू होते. काम असल्याने जावे की नको, या संभ्रमात मी होतो. शुक्रवारी सायंकाळीही मला मित्रांनी फोन करून येण्याचा आग्रह केला. मात्र, मी गेलो नाही. सकाळी साडेअकरा वाजता फोन आला आणि अपघाताची माहिती मिळताच मी हादरून गेलो. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मी वाचलो, असे विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक संतोष महादेव पवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.जाणे टाळले, म्हणून वाचलोकृषी विद्यापीठातील आणखी एक कर्मचारी प्रवीण रणदिवे यांनी पिकनिकला जाण्याचे टाळल्याने ते या अपघातातून बचावले. रणदिवे यांनी सांगितले की, माझा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता, पण तब्येत बरी नसल्याचे कारण देत, मी पिकनिकला जायचे टाळले.मला सकाळी फोन आला, तेव्हाही मी सहकाºयांना येत नसल्याचे कळविले. पिकनिकला गेलेल्यांनी व्हॉट्सअॅपवर फोटोही पाठवले. ९ वाजेपर्यंत चॅटिंग सुरू होते. नंतर ग्रुपचा संपर्कच तुटला. दुपारी १२.३० च्या सुमारास अपघाताची बातमी कळली आणि मन सुन्न झाले, असे रणदिवे म्हणाले.