- दत्ता यादवसातारा - येथील पालिकेच्या प्रवेशद्वाराचे शटर बंद करून त्यासमोर महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून त्याची पूजा केली. तसेच तेथे गायन, वादनाचा कार्यक्रमही केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन कांबळे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी परिसर, सातारा), लक्ष्मण पोळ (रा. मतकर कॉलनी, सातारा), विनीत चव्हाण (रा. जुना दवाखाना वसाहत, सातारा), जतीन वाघमारे व अन्य दोघेजण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ११ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वरील सहा जण सम्राट गायन पार्टी यांच्यासह नगरपालिकेत दाखल झाले. त्यांनी प्रवेशद्वाराचे शटर बंद करून त्याच्यासमोर आडवा टेबल ठेवला. त्यावर महापुरुषांच्या प्रतिमा मांडल्या. त्यांची पूजा करून गायन, वादन केले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. पालिकेचे कर्मचारी प्रशांत शिवाजीराव निकम (वय ५२, रा. शाहूनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.