उंब्रज (सातारा) : चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी पाटण तालुक्यातील सनगरवाडी चालकाचा ताबा सुटल्याने कार राज्यमार्गालगतच्या वडाच्या झाडाला धडकली. या अपघातात पाटण तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ठार तर आणखी एक अव्वल कारकून व मरळीचे मंडलाधिकारी असे दोनजण गंभीर जखमी झाले.
या अपघातात गाडीत असलेल्या दोन्ही एअर बॅग्जच्या उघडलेल्या. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना तातडीने उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. दरम्यान उपचारापूर्वीच पाटण तहसीलदार कार्यालयाचे अव्वल कारकून शिलेवंत गणपत कणसे (५६, रा. गडकर आळी, सातारा. मूळगाव बनपुरी, ता. खटाव) हे ठार झाले. तर मरळीचे मंडलाधिकारी जगन्नाथ भगवान जांबळे (४६, रा. शाहूपुरी सातारा) पाटण तहसीलदार कचेरीतील अव्वल कारकून राजेंद्र रंगराव खरात (४१, रा. रेवडी ता. सातारा) हे गंभीर जखमी झाले.