संजय पाटील ।कºहाड : कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये कºहाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते. वारणा खोऱ्यात चांदोलीचा भाग समाविष्ट होतो. तर कोयना खोºयाने सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. ही दोन्ही खोरी एकमेकानजीक असल्यामुळे दोन्हीपैकी कोणत्याही खोºयात भूकंप झाला तरी त्याची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दोन्हीकडे जाणवते.
मात्र, गत दहा वर्षांत सातारा जिल्ह्यामध्ये जाणवलेल्या एकूण भूकंपांपैकी बहुतांश धक्क्यांचा केंद्रबिंदू सांगलीच्या वारणा खोºयात असल्याचे समोर आले आहे.कोयना विभागात १९६७ मध्ये ६.६ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला. या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला नसला तरी लहान-मोठे हजारो धक्के दरवर्षी या विभागाला बसतायत. गत बारा वर्षांत विभागामध्ये तब्बल सात हजारांपेक्षा जास्त भूकंप ‘किर्णास’ वेधशाळेत नोंदले गेलेत. त्यापैकी बहुतांश भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोºयात असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाºया कोयना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे ‘किर्णास’ भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. वास्तविक येथे प्रादेशिकसह देशभरातील सर्वच भूकंप समजतात. मात्र, नोंद फक्त प्रादेशिक विभागातीलच घेतली जाते. या वेधशाळेतील नोंदीनुसार गत बारा वर्षांत हजारो भूकंपांची नोंद झाली आहे.
या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोºयामध्ये आहे. मात्र, कोयना खोºयात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोºयात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच वारणा खोºयात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तीव्रताही जास्त असल्याचे त्या-त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येत आहे.
११ डिसेंबर १९६७ पासून सांगली जिल्ह्यातील चांदोली व कोयना विभागात खºया अर्थाने भूकंपांची मालिका सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत या दोन्ही खोºयांना हजारो धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता कधी ३ तर कधी ५ पर्यंत नोंदली गेली आहे. किर्णास वेधशाळेत नोंद झालेल्या भूकंपांपैकी गत काही वर्षांतील मोठ्या भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोºयात आहे. केंद्रबिंदू वारणा खोºयाकडे सरकण्याचे भौगोलिक कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गत अनेक वर्षांपासून भूगर्भ तज्ज्ञांकडून त्याची कारणमिमांसा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कºहाडसह कोयना व चांदोली विभागात अभ्यासही सुरू आहे. ....२००७ मध्ये सर्वाधिक भूकंपकिर्णास वेधशाळेतील नोंदीनुसार गत दहा वर्षांमध्ये २००७ मध्ये सर्वात जास्त भूकंपाचे धक्के बसले. २००७ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार २५३, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १३ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकूण १ हजार २६९ भूकंप झाले. २००८ मध्येही तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १११, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ७ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकूण १ हजार १२० भूकंप झाले होते.
हेळवाकपासून सुरू होते वारणा खोरेपाटण तालुक्यातील हेळवाक गावापासून दक्षिणेला हेळवाक खोरे सुरू होते. येथूनच कोयना नदी कºहाडकडे वळली आहे. मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी ही गावे वारणा खोऱ्यात येतात. तर कोयना विभागातही शेकडो गावांचा समावेश आहे.
किर्णासच्या नोंदीनुसार गत बारा वर्षांत झालेल्या भूकंपांपैकी एकच भूकंप ५ रिश्टर स्केलपर्यंत नोंदला गेला. हा भूकंप २०१२ मध्ये झाला होता. तसेच त्याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. या भूकंपाने त्यावेळी काही वित्तहानी झाली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झालेला नाही.
२०१६ मध्येफक्त २७ भूकंपकोयना, चांदोली विभागात २०१२ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंत १ हजार १३६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ तर सहा रिश्टर स्केलपर्यंतचा १ असे एकूण १ हजार १४०, २०१३ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ३९६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकूण ४०३, २०१४ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ४००, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकूण ४०२, २०१५ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २५०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकूण २५३ आणि २०१६ मध्ये तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकूण २७ भूकंप झाले आहेत.
वर्षभरातील भूकंपतारीख रिश्टर स्केल१६ जानेवारी ३.३२१ जानेवारी ३.२०२ फेब्रुवारी ३.२०६ मार्च ३.४२७ मार्च २.८२७ सप्टेंबर २.८१२ नोव्हेंबर ३.११२ नोव्हेंबर ३.०१८ नोव्हेंबर २.९२२ नोव्हेंबर २.८