शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

साताऱ्यात महामार्ग रोखला, बुधवारी सातारा बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:40 PM

मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली.

ठळक मुद्देसाताऱ्यात महामार्ग रोखला, बुधवारी सातारा बंदची हाकमराठा बांधवांच्या संतप्त भावना व्यक्त; वाहतूक काही काळ ठप्प

सातारा : मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली. दरम्यान, जुना आरटीओ कार्यालयाजवळ सोमवारी रात्री शिवशाही बसवर दगडफेक केल्याप्रकरणी अज्ञातांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पंढरपुरातून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंदमधून सातारा जिल्हा वगळण्यात आला होता. महाराष्ट्रभर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मंगळवारी दुपारी मराठा आमदार, खासदारांसह इतर लोकप्रतिनिधींची बैठकही आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीकडे पोलीस खात्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास कार्यकर्ते अकस्मातपणे वाढे फाट्यावर एकत्र आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.. काकासाहेब शिंदेंच्या हौतात्म्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत उड्डाणपुलाखाली आंदोलन सुरू झाले. याची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ उडाली.

दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावरून थेट महामार्गाचा रस्ता धरला. एक मराठा.. लाख मराठा अशा टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरूवात करताच हायवेवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. काही काळानंतर आंदोलन चालले. यावेळी घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी २३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बुधवारी सातारा बंदची हाक, मराठा मोर्चाच्या बैठकीत निर्णयदरम्यान, मराठा आरक्षणासाठी तसेच काकासाहेब शिंदे यांच्या हौतात्म्याला न्याय देण्यासाठी बुधवार दि. २५ जुलै रोजी सातारा बंदचा निर्णय समाजबांधवांच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी सकाळी नऊ वाजता राजवाडा येथून भव्य रॅली निघणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शेवटी धडकणार आहे.

कल्याण रिसॉर्ट येथे झालेल्या समाजबांधवांच्या बैठकीत बुधवारी बंदची घोषणा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता राजवाडा येथे सर्वसमाज बांधवांनी मोठ्या संख्येने जमावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकेल. हा मोर्चा मूक नसल्यामुळे घोषणा दिल्या जातील, मात्र आक्षेपार्ह वक्तव्ये करू नयेत. प्रशासनावर ताण आला पाहिजे. मात्र, कुठलीही तोडफोड होता कामा नये, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.सरकारला मराठा समाजाच्या तीव्र भावना समजाव्यात, यासाठी जिल्ह्यातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने साताऱ्यातील रॅलीत सहभागी व्हावे, असेही आवाहन या बैठकीत करण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर