सातारा : गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असून, २९ डिसेंबर रोजी दोन वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ९.०४ अंश तापमानाची साताऱ्यात नोंद झाली होती. तर गेल्या दहा दिवसांपासून पहाटेच्या सुमारास किमान तापमान सरासरी ११ ते १३ अंशाच्या दरम्यान स्थिर असल्याने थंडी टिकून आहे. त्याचबरोबर दुपारच्या सुमारास ऊन वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूलही जाणवत आहे.यावर्षी नोव्हेंबरपासून थंडीस सुरुवात झाली. सुरुवातीला थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, डिसेंबर सुरू झाल्यापासून किमान तापमान हळूहळू कमी होऊ लागले. डिसेंबरच्या मध्यावर साताऱ्यातील किमान तापमान १४ ते १६ अंशाच्या दरम्यान होते.
गेल्या तीन आठवड्यांपासून किमान तापमान आणखी खालावले आहे. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात तापमान १० अंशाच्या खाली गेले. तर गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील तापमान १० ते १५ अंशाच्या दरम्यान आहे. गेल्या दहा दिवसांचा विचार करता ११ ते १३ अंशाच्या दरम्यान किमान तापमान राहिले आहे. त्यामुळे हवेत गारवा आहे.
सायंकाळी सहापासूनच थंडी जाणवत आहे. पहाटेच्या सुमारास तर थंडीच्या प्रमाणात अधिक वाढ होत आहे. त्याचबरोबर दुपारच्या सुमारास ऊन जाणवत असून, कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला असल्याचा भास होतो.तापमान दिवस किमान कमालदि. १ जानेवारी ११.०२ ३०.०१दि. २ जानेवारी १२.०० ३०.०१दि. ३ जानेवारी १२.०० ३०.००दि. ४ जानेवारी १२.०७ २९.०५दि. ५ जानेवारी १२.०७ २९.०६दि. ६ जानेवारी १३.०४ २८.०६दि. ७ जानेवारी १३.०२ २८.०६दि. ८ जानेवारी ११.०७ २८.०६दि. ९ जानेवारी ११.०८ २८.०३दि. १० जानेवारी १३.०५ ३०.००