शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

Satara: कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानात २६३ शहिदांची नावे, काम पूर्णत्वाकडे

By सचिन काकडे | Published: November 22, 2023 6:40 PM

Satara News: हुतात्मा स्मारकातील १४ गुंठे जागेत आकाराला येत असलेल्या कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे.

- सचिन काकडेसातारा - हुतात्मा स्मारकातील १४ गुंठे जागेत आकाराला येत असलेल्या कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. या उद्यानात स्मृतिस्तंभ तसेच गोलाकार भिंतीवर २६३ हुतात्मा जवानांच्या नावाची कोनशीला बसविण्यात आली असून, सध्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत १७ नोव्हेंबर २०१५ मध्ये साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. त्यांचे शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये झाले होते. त्यांच्या आठवणी तरुण पिढीला प्रेरणा देत राहाव्यात, या हेतूने सातारा पालिकेने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावाही केला. साताऱ्यातील हुतात्मा स्मारकातील १४ गुंठे जागेत हे उद्यान आकाराला येत असून, या कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून पहिल्या टप्प्यात १ कोटी ३२ लाख तर दुसऱ्या टप्प्यात विविध योजनातून दोन कोटींचा निधी मंजूर झाला. कोरोनामुळे कामकाजात खंड पडला होता. परंतु दोन वर्षांपासून हे काम प्रगतीपथावर आहे. उद्यानात स्मृतीस्तंभ उभारण्यात आला असून, भिंतीवर सातारा जिल्ह्यातील २६३ शहीद जवानांच्या नावाची कोनशीला लावण्यात आली आहे. याशिवाय मोकळ्या जागेत लॉन व आकर्षक फुलझाडे देखील लावण्यात आली आहेत.

स्मृतीला उजाळा दिल्लीतील इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरिअल स्मारकाच्या धर्तीवर हे उद्यान आकाराला येत आहे. पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत विविध युद्धांत शहीद झालेले जवान, त्यांचे नाव, कोणत्या युद्धात हुतात्मा झाले व हुतात्मा झालेली तारीख अशी माहिती असलेल्या एकूण २६३ जवानांच्या कोनशीला या स्मारकात लावण्यात आल्या आहेत. या माध्यमातून शहिदांच्या स्मृतींना उजाळादेखील देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndian Armyभारतीय जवान