Satara: विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला चार मतदारसंघ घ्या, ५० टक्के जागांवर ठाम राहण्याचा निर्धारही व्यक्त, जिल्हा बैठकीत ठराव

By नितीन काळेल | Published: July 1, 2024 07:39 PM2024-07-01T19:39:57+5:302024-07-01T19:40:06+5:30

Satara News: लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने प्रचारयंत्रणा राबविलेल्या भागात महाविकास आघाडी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. काॅंग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला आठपैकी चार जागा मिळाव्यात असा ठराव काॅंग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.

Satara: Congress to win four constituencies in assembly elections, expressed determination to stand firm on 50 percent seats, district meeting resolves | Satara: विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला चार मतदारसंघ घ्या, ५० टक्के जागांवर ठाम राहण्याचा निर्धारही व्यक्त, जिल्हा बैठकीत ठराव

Satara: विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला चार मतदारसंघ घ्या, ५० टक्के जागांवर ठाम राहण्याचा निर्धारही व्यक्त, जिल्हा बैठकीत ठराव

- नितीन काळेल 
सातारा  - लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने प्रचारयंत्रणा राबविलेल्या भागात महाविकास आघाडी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. काॅंग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला आठपैकी चार जागा मिळाव्यात असा ठराव काॅंग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. तसेच विधानसभेला जिल्ह्यातील ५० टक्के जागा लढविण्याचा ठाम निर्धारही पदाधिकाऱ्यांनी केला.

येथील जिल्हा काॅंग्रेस कमिटीत जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर बैठक झाली. यामध्ये लाेकसभा निवडणुकीचा आढावा आणि आगामी विधानसभेबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मते व्यक्त केली. या बैठकीला जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, काॅंग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर राजकीय चर्चा करण्यात आली. यावर जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्षांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के म्हणजे विधानसभेचे आठपैकी चार मतदारसंघ काॅंग्रेसला देण्याची मागणी जिल्हा काॅंग्रेस कमिटीने प्रदेश काॅंग्रेसकडे करावी. त्याचबरोबर काॅंग्रेसनेही महाविकास आघाडीसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवावा. जिल्हा काॅंग्रेस कमिटीनेही माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्यामार्फत ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी बैठकीत तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मते व्यक्त केली आहेत. याबाबत जिल्हा काॅंग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीकडे प्रस्ताव पाठवून निम्म्या जागा मागेल. तसेच या मागणीवर आपण ठाम राहू, असे स्पष्ट केले. तर जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले. महाविकास आघाडी उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला, याची सल आहेच. आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी तयार रहावे. जिल्ह्यातील विधानसभेचे अधिकाधिक मतदारसंघ काॅंग्रेसकडे घेण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. तसा प्रयत्न प्रदेश काॅंग्रेस कमिटीकडे करेन, असे आश्वासन दिले.

या बैठकीला काॅंग्रेसच्या महिला प्रदेश सचिव धनश्री महाडीक, प्रदेश प्रतिनिधी बाबासाहेब कदम, रफिक बागवान, राजू मुलाणी, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, काेरेगाव तालुकाध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण, जावळी अध्यक्ष संदीप माने, पाटण अध्यक्ष अभिजित पाटील, वाईचे विलास पिसाळ, खंडाळा सर्फराज बागवान, खटाव डाॅ. संतोष गोडसे, महाबळेश्वरचे नंदकुमार बावळेकर, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, युवक काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, कल्याण पिसाळ, अन्वर पाशाखान, एम. के. भोसले, मनोजकुमार तपासे, युवकचे जिल्हाध्यक्ष अमरिजत कांबळे, अमित जाधव, सलीम बागवान, उमेश मोहिते, नाजीम इनामदार, डाॅ. शंकर पवार, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
 
हे मतदारसंघ असणार...
सातारा जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. तर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर राष्ट्रीय काॅंग्रेसचा एक आहे. काॅंग्रेसच्या बैठकीत चार जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यातील कऱ्हाड दक्षिण हा मतदारसंघ असणार आहे. येथून माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण हे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे हा मतदारसंघ काॅंग्रेसकडेच राहील. तर माण, वाई आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची इतर तीनमध्ये मागणी होऊ शकते असा अंदाज आहे.

Web Title: Satara: Congress to win four constituencies in assembly elections, expressed determination to stand firm on 50 percent seats, district meeting resolves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.