सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असला तरी जोर कमी झाला असून, कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळपर्यंत ४० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर धरणात १०१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. पाऊस कमी झाल्याने धरणाचे दरवाजे पाच फुटांवरून चार फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत. सोमवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात ४० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १०१.२५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला.
धरणात ३८,३७३ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळी सातच्या सुमारास धरणाचे दरवाजे पाच फुटांवरून चार फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. दरवाजातून ३३,२१८ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून ३५,३१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सोमवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.५६ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.५७, बलकवडी ३.८७ तर तारळी धरणात ५.३८ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०८/५५२कोयना ४० /४६१६बलकवडी २७ /२२९६कण्हेर ०३ /६३६उरमोडी १६ /१०४३तारळी २८ /१९३९