सातारा : लोकभावनेचा आदर राखून शांतिदुताचा पुतळा आहे त्याच जागेवर पोलीस मुख्यालयासमोर बसविण्याचा प्रारंभ बुधवारपासून करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते १८ शांतिदूत आकाशात सोडण्यात आले. यावेळी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.शांतिदूत आहे त्याच ठिकाणी बसविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. बुधवारी विविध संघटना आणि त्यांचे पदाधिकारी पोलीस मुख्यालयासमोर जमले. साखर, पेढे वाटून पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात शांतिदूत हटविण्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. ते आता शमले असून, पोलिसांनी शांतिदूत त्याच जागेवर बसविण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांत हा शांतिदूत पुन्हा त्याच ठिकाणी बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.