सातारा : कृष्णा नदीपात्रात संगम माहुली येथे गणेश विसर्जन केल्यानंतर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मुन्ना कुमार सुरेंद्र साव (वय २४, रा. कोटेश्वर मैदान, सातारा, मूळ बिहार), गुलाब सनगीर गोसावी (वय ५२, प्रतापगंज पेठ, सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की, प्रतापगंज पेठेतील महाराजा प्रताप चौकातील गणेश मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली. मंडळाने संगम माहुली येथील कृष्णा नदीपात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. विसर्जन झाल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सर्वजण नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले. त्यावेळी गुलाब गोसावी व मुन्ना साव हे दोघेही नदीपात्रात उतरले. त्या दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळ दोघे पाण्यातून बाहेर न आल्याने इतरांनी शोधाशोध सुरू केली. ते दोघे पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना पाण्यातून बाहेर काढले. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार दगडे करीत आहेत.इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यूसातारा : इमारतीचे बांधकाम करत असताना पिलेश्वरनगर, सातारा येथे सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुसºया मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. बरमा मिश्राम सिंग (वय ४५, मूळ रा. शिवान, बिहार) असे मृताचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, पिलेश्वरनगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे प्लास्टरचे काम सुरू आहे. बरमा सिंग हे सोमवारी सकाळी प्लास्टरचे काम करत होते. दरम्यान, त्यांचा पाय घसरल्याने ते दुसºया मजल्यावरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला, हाता व पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर इतर कामगारांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.गणपती पाहण्यास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्यासातारा : गणपती पाहण्याची परवानगी न दिल्याच्या कारणावरून एका तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे रविवारी घडली.सुवर्णा तुळशीदास गुजर (वय १७, रा. पवळेश्वर, माळ, लिंब, ता. सातारा) असे मृत तरुणीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सुवर्णा गुजर हिला गणपती मिरवणूक पाहायची होती. त्यास तिच्या आई-वडिलांनी मनाई केली. गणपती पाहण्यासाठी गावामध्ये न आणल्याच्या कारणावरून सुवर्णाने लिंब ते नागेवाडी हायस्कूलच्या पाठीमागे अभ्यंकर विहिरीत उडी मारली. त्यामुळे पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी धनंजय राजाराम जमदाडे (वय ५१, लिंब, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.