सातारा : पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत मारहाण करून जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे व टोळीतील तीन सदस्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.याबाबत मोहती अशी की, रणशिंगवाडी, ता. खटाव येथे सायकलवर जाणाऱ्या एकास अडवून हवा मारण्याचा पंप डोक्यात घालून दुखापत केली व त्याच्या साथीदारांनी जबरदस्ती खिशातले दहा हजार काढून घेतल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासामधून ही टोळी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, गर्दीत मारामारी व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करीत होती. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता. तो त्यांनी मंजूर केला.