सागर गुजर ।जिल्ह्यात आठ विधानसभा व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू आहे. लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूकही होणार असल्याने प्रशासनावर साहजिकच ताण येणार आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र दोन्ही निवडणुकांची पूर्वतयारी केलेली पाहायला मिळते. मागील लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पडली. आता ही निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन प्रशासनासमोर असणार आहे.
प्रश्न : निवडणुकीची नेमकी काय तयारी सुरू आहे?उत्तर : लोकसभेसाठी १३ हजार ५०० वोटिंग मशिन्स दाखल झाल्या आहेत. वखार महामंडळाच्या गोदामात या मशिनस ठेवण्यात आल्या आहेत. याची नुकतीच तपासणी केली आहे. तर आठ विधानसभा मतदारसंघांमध्येही मशिन्स पाठविण्यात आलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्यावरच लक्ष आहे.
प्रश्न : एक खिडकी योजना काय आहे?उत्तर : निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अनेक परवान्यांची गरज असते. हे सर्व परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभेसाठी तर प्रत्येक प्रांत कार्यालयात विधानसभेसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे.
प्रश्न : मतदार जागृती कशी सुरू आहे?उत्तर : मागील लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी तसेच लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, यासाठी अनेक प्रयोग राबवले. याचा परिणाम म्हणजे ४ टक्के मतदान वाढले आहे. तरुण मतदारांमध्ये मोठा उत्साह जाणवतो. प्रशासकीय कर्मचारी तसेच खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मतदानाची संधी मिळणार आहे.सी व्हीजील अॅपचा सुयोग्य वापर करानिवडणूक आयोगाच्या ‘सी व्हिजील’ अॅपमुळे गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम होत आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्येही नागरिकांना या अॅपवर तक्रारी नोंदवता येणार आहेत. या अॅपबाबत ‘लोकमत’ने जनतेत जी जागृती केली, त्यामुळे निश्चितच असंख्य मतदारांना माहिती मिळाली आहे. नागरिकांनी अॅपचा जास्त वापर करावा.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसह लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकीत कुठलाही गैरप्रकार होऊ नये, याची विशेष काळजी घेतली आहे. - श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी