सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेतले जाणार आहे. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लावलेल्या आहेत.या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, शेखर गोरे, मनोज पोळ, प्रभाकर घार्गे याच्यात महत्त्वाच्या लढती होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९६४ मतदार विविध केंद्रांवर मतदान करणार आहेत.
सातारा जिल्हा बँक निवडणूक : मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 11:35 AM