- सागर गुजर
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तब्बल चार वर्षांपूर्वी नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, या भरती प्रक्रियेविरोधात राज्य शासन व न्यायालयात तक्रार झाल्याने ही प्रक्रिया ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. गेल्या चार वर्षांत नव्याने भरती प्रक्रियाही राबवली गेलेली नाही.
बँकेमध्ये ३८५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र, या भरती प्रक्रियेविरोधात राज्य शासनाकडे तक्रार झाली होती. या तक्रारीनंतरही भरती रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
मात्र, त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती दिली होती. त्यावेळी भरती केलेले कर्मचारी बँकेत काम करत आहेत. मात्र, २०१७ नंतर जिल्हा बँकेत एकदाही भरती प्रक्रिया राबवली गेली नाही.
सांगली जिल्हा बॅंकेतील नोकरभरतीबाबतही तक्रारीसांगली जिल्हा बॅंकेतील नोकरभरतीबाबतही तक्रारी झाल्या होत्या. अमरावतीच्या महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ सॉफ्टवेअर या कंपनीला त्याचे काम दिले होते. परंतु, चौकशी होऊन सहकार विभागाने ‘क्लिनचीट’ दिली आहे. यशिवाय उच्च न्यायालयानेही या संदर्भातील एक याचिका फेटाळली आहे.