शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मीटर बॉक्समध्ये पाणी गेल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात लागली आग, तातडीने आग विझविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 1:21 PM

तातडीने वायरिंग दुरुस्ती हाती घेण्यात आली

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागातील व्हरांड्यामध्ये असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन शनिवारी रात्री साडेनऊ वाजता शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.सातारा शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला आहे. साताऱ्यात शनिवारी रात्रीसुद्धा पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या विभागासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास एका मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे मीटर बॉक्सच्या बाहेर ठिणग्या उडून आग लागली.या आगीची माहिती मिळताच आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर यांची एकच पळापळ झाली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी बाह्यरुग्ण विभागातील काही डॉक्टर आणि वॉर्ड बॉयनी अग्निशमन यंत्राच्या आधारे ही आग तत्काळ विझविली. मीटर बॉक्सच्या लगतचा एमसीबीचा खटका खाली पाडल्याने काही वेळ रुग्णालय परिसरात अंधार होता. अर्ध्या तासात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

मीटरमध्ये शाॅर्टसर्किट झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत वाॅर्ड बाॅयनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग पूर्ण आटोक्यात आणली. रुग्ण व नातेवाइकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. तातडीने वायरिंग दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. -डाॅ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलfireआग