सातारा : केमिकल भरून महाडवरून साताऱ्याच्या दिशेने निघालेला कंटेनर सोमवारी पहाटे केळघर घाटातील दरीत जाता जाता वाचला. त्याची अर्धी बाजू वरच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून कंटेनरमधून दोघांनीही मृृत्यूला हुलकावणी दिली.महाबळेश्वरनजीक केळघर घाटातून कंटेनर (एचआर ५५ एक्स ७५५४) साताऱ्यांच्या दिशेने जात होता. काळाकड्याच्या तीव्र वळणावर चालक मलंग शेख व वाहक साहेबलाल शेख यांनी उडी मारली.
दरम्यान, गाडीची मागील बाजू रस्त्यावर आणि चालक केबीन दरीत लोबंकळत होती. दरीच्या बाजूला असलेल्या झाडाच्या खोडामध्ये अडकल्याने कंटेनर दरीत कोसळता कोसळता वाचला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने घटनास्थळी दाखल झाले. लटकलेला कंटेनर बाहेर काढण्यात आला.