दहिवडी : बिदाल गावात जलसंधारणाची खूप कामे झाली मात्र त्यानंतर सलग दोन वर्षांत पुरेसा पाऊस पडला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांना जनावरांना प्यायला पाणी नाही. बिदालची मूळची आणेवारी ५० पेक्षा कमी असतानाही चुकीच्या नोंदीमुळे बिदालला सुविधा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.दहिवडी, भांडवली, शिंदी, मलवडी परिसरात या अगोदर पाऊस झाला होता. मात्र, मध्येच बिदालला पाऊस झाला नव्हता ती परिस्थिती प्रशासनाने शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते, ती आणली नसल्याचे उघड झाले. पाऊस पडला नाही तर शासनाने चारा व पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असा ठराव सुरेश बोराटे यांनी मांडला त्याला माजी सरपंच सुरेश जगदाळे यांनी अनुमोदन दिले.घरकुल योजनेमध्ये योग्य व्यक्तीला घरे दिली जावीत, असा विषय शंकर जगदाळे यांनी मांडला तर या बाबत माहिती घेतली जाईल व नंतरच निर्णय घेऊ असे सांगितले. जलयुक्त कामाची माहिती सुरेश बोराटे यांनी विचारली तसेच मोठ्या प्रमाणात निधी असल्याचे निदर्शनास आणले. आबा पाटील यांनी मागणी करुनही सिमेंट बंधारा होत नसल्याची खंत व्यक्त केली. रस्त्याच्या लाईट, गटाराची स्वच्छता शौचालये त्याच बरोबर नवीन घराची नोंद घरपट्टी वसुली या विषयी सखोल चर्चा करण्यात आली.या चर्चेत शिवाजी जगदाळे प्रताप भोसले, तानाजी मगर, सतीश आप्पा जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, सोमनाथ भोसले, बापूराव जगदाळे, शंकर जगदाळे, किरण जगदाळे, प्रमोद खरात, सुरेश बोराटे, किरण जगदाळे, हणमंत फडतरे, चंद्रकांत ढोक, मोहन सावकार, निवृत्ती जगदाळे, पुष्पांजली मगर, देवराम जाधव यांनी सहभाग घेतला. या वेळी सरपंच गौरी जगदाळे, उपसरपंच सविता कुलाळ सर्व सदस्य ग्रामसेवक चव्हाण, कृषी विभागाचे मोरे, तलाठी उपस्थित होते.
सातारा : जलसंधारणाची कामे होऊनही चारा टंचाई, बिदालच्या ग्रामसभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 3:01 PM
बिदाल गावात जलसंधारणाची खूप कामे झाली मात्र त्यानंतर सलग दोन वर्षांत पुरेसा पाऊस पडला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांना जनावरांना प्यायला पाणी नाही. बिदालची मूळची आणेवारी ५० पेक्षा कमी असतानाही चुकीच्या नोंदीमुळे बिदालला सुविधा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ठळक मुद्देअत्यल्प पाऊस होऊनही आणेवारीत चुकीच्या नोंदी शासनाने प्रश्न मार्गी लावावा; बिदालच्या ग्रामसभेत ठराव