सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयनेचे दरवाजे साडेपाचवरून साडेचार फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. दरवाजा आणि पायथा वीजगृहातून ४१५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत आहे. या पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पडला तर सोमवारी रात्रीपासून पाऊस कमी झाला आहे.
कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ३३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सकाळी सातपासून धरणाचे दरवाजे साडेपाचवरून साडेचार फुटांपर्यंत खाली घेण्यात आले आहेत. त्यातून ३९४१४ तर पायथा वीजगृहातून २१०० असा ४१५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील धोम धरणात १२.७२ टीएमसी साठा असून, ४८७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरणातून २७४३ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणातून १६९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेर, बलकवडी या धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०२ /६०९कोयना ३३/ ५११८बलकवडी ३३ /२६१३कण्हेर ०५ /७०८उरमोडी ०६ /१२०५तारळी २७ /२१५९