सातारा : जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरलेल्या या ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटननिमित्ताने सकाळी साडेआठला ग्रंथदिंडी काढण्यात आली. राजवाडा येथील गांधीमैदानापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. मोती चौक, राजपथ, पोवई नाका मार्गे ही दिंडी जिल्हा परिषदेच्या मैदानावर पोहोचली.
यामध्ये काही शाळांनी जनजागृती करणारे चित्ररथही सहभागी केले होते. यामध्ये महोत्सव समितीचे पदाधिकारी, साहित्यिकही सहभागी झाले होते. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सव परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन यासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.